उत्तर महाराष्ट्र

मी सीआयडी अधिकारी..असे सांगून वृध्दाला लुटले  

धनराज माळी

नंदुरबार ः सीआयडी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत नंदुरबारात एका ७० वर्षीय वृध्दाकडे ५० हजाराची रोकड व अडीच लाखाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी भर दुपारी घडली. 

याप्रकरणी दोन अज्ञातांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील आदेश्वर नगरात राहणारे खेतमल मिश्रीलाल जैन ( वय ७० ) हे डि.आर.हायस्कूल ते महाराणा प्रताप चौकादरम्यान रस्त्याने जात होते.

मागून दोन जण आले अन...

खेतमल हे जात असतांना त्याच्या मागून दोन अज्ञात व्यक्ति आले. आणि खेतमल जैन यांना म्हणाले, आम्ही सीआयडीचे पोलीस निरीक्षक आहे असे सांगुन दिशाभूल केले. व खेतमल जैन यांच्याकडील ५० हजाराची रोकड व २ लाख ५० हजाराची सोन्याची चैन व अंगठी चोरुन नेली.

पैसे दागिने घेवून चोरटे पसार

खेतमल यांच्याकडील पैसे, चैन,अंगठी घेवून दोघे चोरटे मुद्देमाल घेवुन पसार झाले. याबाबत खेतमल मिश्रीलाल जैन यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बिन्हाडे करीत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT