उत्तर महाराष्ट्र

लग्नमंडपात सुरू होते कन्यादान; अचानक नवरदेवाची आई चक्रावली आणि सर्वांची सुरू झाली शोधाशोध !

सम्राट महाजन

तळोदा :  तळोदा येथील मुलीचे सुरत येथील मुलासोबत मंगळवारी तळोदा येथे लग्न होते. लग्नमंडपात सर्वत्र आनंदाचे वातावरण त्यात मंत्रोपचारात कन्यादान सुरू होते. लग्नमंडपात बसलेल्या नवरदेवाच्या आईने बाजुचे दृष्य बघताच त्या चक्रावल्या आणि त्यानंतर सर्वांची लग्नमंडपात शोधाशोध सुरू झाली. 

सुरत येथून मुलाच्या लग्नासाठी तळोदा येथे आलेल्या वर मातेची कन्यादान सुरू असताना लग्नाच्या मंडपातून चोरट्यांनी पर्स लंपास केल्याची घटना आज दुपारी घडली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात नवरदेवाच्या आई मिनाबाई गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

अशी घडली घटना...

सुरत येथील मीनाबाई गुरव यांच्या मुलाचे तळोदा येथील राजेंद्र गुरव यांची मुलगी सोबत १९ जानेवारीला लग्न होते. मुलाचे लग्न लागल्यानंतर कन्यादानाचा पूजेसाठी मंडपात बसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली पर्स बाजूलाच ठेवली होती. पूजा झाल्यानंतर त्यांना त्यांची पर्स त्याठिकाणी दिसून आली नाही. पर्सचा शोध घेतला असता ती पर्स कोणीतरी चोरून नेल्याचे लक्षात आले.

पर्समधे होते दागिने

चोरीला गेलेल्या पर्समध्ये पंधरा हजार सहाशे रुपये किमतीचे तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, पंधरा हजार सहाशे रुपये किमतीचे तीन ग्रॅम सोन्याचे टॅप्स, ५ हजार २०० रुपयाचे एक ग्रॅम सोन्याचे ओम पान, ५ हजार २०० रुपयाची एक ग्रॅम सोन्याची नथ, एक हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे जोडवे असे एकूण ४२ हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने तसेच ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल व ९० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज होता.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: रात्रीही लोकलमध्ये टीसी फिरणार, २४ तास तिकीट चेकिंग होणार; रेल्वे प्रशासनाची विशेष "बॅटमॅन" मोहीम

MS Dhoni: 'थाला' पुन्हा मैदानात दिसेल; धोनीच्या चाहत्यांनी आता आशा सोडावी का...? वास्तव स्वीकारण्याची वेळ आली!

Latest Marathi News Live Update: डोंबिवलीनजीक रुणवाल गार्डनमध्ये पाणीटंचाई, नागरिकांचा बिल्डर कार्यालयावर मोर्चा

PCOS & IVF Failure Causes: PCOS, अनियमित पाळी आणि IVF Failure मागे स्ट्रेस कारणीभूत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SSC Success Story: ऊसतोड मजुरांच्या मुलीची भरारी; ऊस तोडणी करत दहावीत दीपाली बुधवंतने मिळवले ८०.२० टक्के, कष्ट, संघर्ष आणि जिद्दीचा संगम..

SCROLL FOR NEXT