Thieves stole cash from Tejashree mobile shop and stole mobile phone esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: चिमठाण्यात मोबाईल दुकानावर चोरट्यांचा डल्ला; एका महिन्यात तिसरी घटना

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील बसस्थानक परिसरातील तेजश्री मोबाईल दुकान शनिवारी (ता.१५) मध्य रात्री चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये रोख, मोबाईल व मोबाईल टॅब असे एकूण ६१ हजार ३०० रुपयांच्या वस्तूवर डल्ला मारला. (Thieves attack mobile shop in Chimthanah Third incident in month Dhule Crime News)

योगेश्वर राजेंद्रसिंह गिरासे (वय ३३, रा. दलवाडे, प. सोनगीर) यांचे चिमठाणे बसस्थानक परिसरात तेजश्री मोबाईल दुकान आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून घरी निघून गेला होता.

सकाळी शेजारी दुकानदार शाना धनगर याने रविवारी (ता.१६) फोन केला, की तुमच्या दुकानाचे शटर तोडून चोरी झाली आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरट्यांनी तोडफोड करुन नुकसान केल्याचे दिसले.

तसेच दुकानाच्या काऊंटरच्या गल्ल्यात ठेवलेले रोख २५ हजार रुपये, मोबाईल अॅसेसरीज, इतर किरकोळ मोबाईल अॅसेसरीज, टॅब असे एकूण ६१ हजार ३०० रुपये किमतीच्या वस्तू चोरट्यांनी लांबविल्या.

रविवारी सायंकाळी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरिक्षक प्रशांत गोरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सदेंसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

रविवारी दुपारी शिरपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, सहाय्यक निरिक्षक प्रशांत गोरावडे, धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक प्रकाश पाटील , हवालदार सदेंसिंग चव्हाण, शव्नपथक व ठसे तज्ञ यांनी ठसे घेतले आहेत.

शव्न ' प्रिन्स ' याने दोंडाईचा राज्य महामार्गा लगत पाटचारी पर्यंत चोरट्यांचा माग दाखविला असून तेथून चोरट्यांनी वाहन वापरले असा कयास पोलिसांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांपुढे आवाहन

चिमठाणे येथील बसस्थानक परिसरातील बॅक ऑफ इंडियाचे १२ जूनला एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला होता. ते सीसीटीव्ही बंद होवून त्याचा तपास लागत नाही.

लगेच २१ जूनला चिमठाणे विविध कार्य कारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष देवीदास नगराळे यांच्या घरी अज्ञात चार चोरट्यांनी घरफोडी केली होती त्यात रोख व सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण सुमारे तीन लाखांची चोरी करण्यात आली होती.

तीचा तपास लागत नाही तेव्ह्यात काल शनिवारी रात्री मोबाईल दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

पोलिस कर्मचारी वाढविण्याची मागणी

शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६९ गावांचा समावेश असून चिमठाणे पोलिस दुरक्षेञ अंतर्गत 33 गावांचा समावेश आहे.

पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनिल भाबड यांची बदली झाल्याने चिमठाणे दुरक्षेञाचे सहाय्यक निरिक्षक प्रशांत गोरावडे यांच्या कडे शिंदखेडा पोलिस ठाण्याचा प्रभारी म्हणून अतिरिक्त कार्यभार असल्याने येथे फक्त एक हवालदार, एक पोलिस नाईक व दोन पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. येथे पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT