the thief was caught on CCTV. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : चोरट्यांनी 2 प्लायवूडसह 3 दुकाने फोडली; 6 लाखांची रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरानजीक असलेल्या अवधान (ता. धुळे) परिसरातील दोन प्लायवूड दुकानांसह त्याच भागातील अन्य एक दुकान चोरट्यांनी शनिवारी (ता. ९) पहाटे फोडले. यात एका प्लायवूड दुकानातून सहा लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली, तर अन्य दोन घटनांमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.(Thieves broke 3 shops including 2 plywood dhule crime news)

बालाजी प्लायवूडचा पहारेकरी शनिवारी (ता. ९) पहाटे गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी दुकानाच्या एकाच बाजूला लावलेले कुलूप तोडले व शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली सहा लाखांची रोकड लंपास केली. पहाटे पाऊणच्या सुमारास चार चोरटे दुकानात शिरताना सीसीटीव्हीत कैद झाले.

यातील एक चोरटा शटर उचकटताना दिसून येत आहे, तर अन्य तिघे दुकानाच्या आत व बाहेर पडताना दिसत आहेत. ओळख पटू नये म्हणून त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले दिसतात. घटनेची माहिती मिळाल्यावर दुकानमालक नितीन पिंगळे यांनी मोहाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, विनायक मोरे, श्री. सूर्यवंशी, प्रेमराज पाटील, किसन चौधरी, भूषण सपकाळे, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, सुशील शेंडे, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चित्रणाची पाहणी केली.

ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरील बोटांचे ठसे घेतले, तर श्वानाने काही अंतर माग काढला. दुकानमालक नितीन पिंगळे यांनी शुक्रवारी (ता. ८) रात्रीच दुकानात प्लायवूड भरून वाहन दुकानात लावल्याचे पथकाला सांगितले. बालाजी प्लायवूड येथे हात साफ केल्यावर चोरट्यांनी शेजारील संतोष हार्डवेअर गुदामाकडे मोर्चा वळविला.

तेथे त्यांनी गुदामाच्या शटरचे कुलूप तोडले, मात्र तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही. नंतर चोरट्यांनी टोलनाक्याजवळील टॉपलाइन वेअरहाउसलाही लक्ष्य केले. या ठिकाणी नंदुरबार येथील सचिन शर्मा यांनी श्यामपुष्प नावाची एजन्सी सुरू केली आहे. एजन्सीत हल्दीरामचे प्रॉडक्ट होते. मात्र, चोरट्यांच्या हाती ठोस काही लागले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT