cow esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दोंडाईचात कारमधून पळविली गाय; चोरटे मात्र फरार

सकाळ वृत्तसेवा

निमगूळ (जि.धुळे) : दोंडाईचा शहरातील सरस्वती कॉलनीत चोरट्यांनी भरदिवसा चक्क कारमध्ये गाय चढवत असताना युवकांनी पाहिले अन् पाठलागही केला मात्र चोरटे पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, दोंडाईचा पोलिस अज्ञात वाहन व चोरट्यांचा शोध घेत आहेत. (thieves stole cows from car dhule crime news)

बुधवारी (ता. २९) दिवसा दोंडाईचा शहरातील सरस्वती कॉलनीत ओपन स्पेससमोरील घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक कार थांबलेली व त्या परिसरात असलेल्या गुरे फिरताना दिसतात.

त्यातील लाल रंगाच्या गायीला चोरट्याने मागून ढकलून गाडीत टाकले, तेवढ्यात घरातील लोकांनी पाहिले असता चोरट्यांनी कार पळविली, काही नागरिकांनी पाठलाग केला परंतु चोरटे पसार झाले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर?

दोंडाईचा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, उपनिरीक्षक शरद लेंडे, उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलिस शिपाई प्रेमराज पाटील, दुसाने उशिरापर्यंत चौकशी करत होते. दरम्यान, शहरातील नागरिकांनी आपले पाळीव गुरे मोकाट फिरू देऊ नयेत, तसेच काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT