theft
theft esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : चोरट्यांची अभियंत्याच्या घरात पार्टी!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : पार्टी करत चोरट्यांनी अभियंत्याच्या (Engineer) बंगल्यात धाडसी चोरी केली. देवपूरमधील प्रमोद नगरालगत आदर्श कॉलनीत ही घटना घडली.

यात तब्बल पंधरा तोळे वजनाचे सोने- चांदीचे दागिने लंपास केले गेले. या प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याकडून गुन्हा दाखल झाला. (thieves theft in engineers bungalow Gold silver ornaments were looted dhule crime news)

चोरट्यांनी अभियंत्याच्या घरात फ्रीजमधील थंड पेय आणि काही पदार्थांवरही ताव मारला. प्रमोदनगर सेक्टर नंबर एकमधील आदर्श कॉलनीत प्लॉट क्रमांक ३७ आहे. तेथे अभियंता तथा कॉन्ट्रॅक्टर अरुण विनायक भालेराव वास्तव्यास आहेत.

ते कुटुंबासह पुणे येथे गेले होते. त्यामुळे बंगला बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. त्यांनी बंगल्याच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातून सोने, चांदीचे सुमारे पंधरा तोळे वजनाचे दागिने लंपास केले. त्याची किंमत सरासरी साडेसात ते आठ लाख इतकी आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

चोरट्यांनी फ्रीजमधील कोकोकोला, काही पदार्थांवर ताव मारत पार्टी केली. श्री. भालेराव हे गुरुवारी (ता. ९) रात्री बंगल्यात परतले असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच, श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT