crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : तेरावर्षीय बालकाच्या गळ्याला चाकू लावून मोबाईलची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : ‘मोबाईल दे नाहीतर गळा चिरेन’ असे धमकावत एका तेरावर्षीय बालकाच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरटा फरारी झाला.

मुलाचा जीव वाचला हे महत्त्वाचे, मोबाईल नाही मिळाला तरी चालेल मात्र चोरटा पकडला पाहिजे, अशा तीव्र भावना मुलाच्या पालकांनी व्यक्त केल्या.(Thirteen year old boy mobile was stolen nandurbar crime news)

शहरातील मंगलदास पार्क परिसरातील आस्था हॉस्पिटलमागील बाजूस राहणाऱ्या फिरोज अघाम यांचा तेरावर्षीय मुलगा इबादत फिरोज अघाम मित्रांसोबत रात्री फेरफटका मारण्यासाठी परिसरात फिरत असताना अचानक एका व्यक्तीने त्याच्याजवळून मोबाईल मागितला.

त्याने मोबाईल दिला नाही. त्यानंतर थोड्या वेळाने परत तोच व्यक्ती त्या मुलाजवळ आला आणि म्हणाला, ‘तुझा फोन मला दे. दिला नाहीतर तुझा गळा चिरून टाकेन,’ असे म्हणत त्या व्यक्तीने धारदार चाकू गळ्याला लावून धमकावले.

या वेळी बालक भयभीत झाले व रडायला लागले. त्याने एक लाख ३० हजार रुपयांचा आयफोन त्या व्यक्तीला दिला. जीव वाचवत इबादत अघाम घरी पळाला. ही घटना नुकतीच घडली.

यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवापूर शहरात चोरट्यांची दहशत कायम असून, पोलिस प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT