crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : शेती अवजारे चोरणाऱ्या तिघांना अटक; चार गुन्हे उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतांमध्ये शेती अवजारे चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. (Three arrested for stealing agricultural implements Nandurbar Crime News)

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अमलाड (ता. तळोदा) येथील तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी चोरीच्या गुन्ह्यांचे तपास करण्याचे आदेश ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात झालेल्या शेती साहित्य चोरीच्या पद्धतीचा अभ्यास केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यात अमलाड (ता. तळोदा) गावात राहणारे हरीश गोसावी, अरुण गोसावी, भरत पाडवी यांनी मिळून केली असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा तालुक्यातील आमलाड गावात जाऊन माहिती काढली असता ते तळोदा शहरातील

चिनोदा चौफुली परिसरात आढळून आले. त्यांना पथकाने ताब्यात घेतले. शेती अवजारे चोरींबाबत विचारले असता त्यांनी आमलाड, तळवे, मोड, चिनोदा व नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील शेतातून रात्रीच्या वेळी ठिबक नळी व लोखंडी नागर चोरी केल्याबाबत कबुली दिली. त्यांच्याकडून दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT