accident. 
उत्तर महाराष्ट्र

चांदवड येथे अपघातात वणी येथील एकाच कुटुंबातील तीघे ठार

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक)  -  मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवड येथील रेणूका मंदीराजवळ फोर्ड फिगो कारने राज्य परीवहन महामंडळाच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने वणी येथील तीघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाले आहे. धुळे येथून भाचीचे लग्न आटोपून वणी येथे परतांना वणीतील संजय समदडिया यांचेसह कुटुंबीयावर काळाने झडप घातली.

येथील महेंद्र (संजय) समदडिया हे धुळे येथे आपल्या भाचीच्या विवाह समारंभासाठी सोमवारी सकाळी वणीहून धुळे येथे गेले होते. काल ता. २३ रोजी सांयकाळी भाजीचे लग्न संपन्न झाल्यानंतर आज सकाळी साडे आठच्या दरम्यान धुळे येथून पत्नी व मुलासह महेंद्र समदडिया हे वणी येथे येण्यासाठी निघाले होते. धुळे येथून चांदवड - धोंडाबा मार्ग वणी येथे परतांना आज सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान चांदवड येथील रेणूका मंदीरा जवळ बसला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने महेंद्र समदडीया वय. ५०, वंदना समदडिया ( वय. ४८) पत्नी, हिमांशु समदडिया ( वय १८) मुलगा हे जागीच ठार झाले. तर हार्दिक समदडिया (मुलगा) वय. १८ हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

महेंद्र समदडिया हे येथील किसनलालजी बोरा इंग्लिश मेडीयम स्कूल संस्थेचे संस्थापक संचालक तसेच सप्तशृंगी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक पदावर होते. तर संजय फर्निचर व इलेक्ट्रॉनिकचे संचालक होते. मुलगा हिमांशु हा चार्टड अकाऊंटंटचे नाशिक येथे शिक्षण घेत होता. तर वंदना समदडिया या जैन महिला मंडळाच्या सदस्या होत्या. 

दरम्यान येथे अपघाताचे वृत कळताच सर्वत्र शोककळा पसरली असून, जवळचे नातेवाईक हे घटनास्थळी रवाना झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT