Lonkheda (Shahada): Tractor and Indica car damaged in an accident esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News : लोणखेडा येथे Tractor-Indica चा अपघात; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

पुरुषोत्तमनगर : लोणखेडा (ता. शहादा) येथे शनिवारी (ता. १४) रात्री दहाला सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्थेजवळ ट्रॅक्टरवर इंडिका व्हिस्टा गाडी समोरून आदळल्याने अपघात झाला.

रात्री दहाला नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड, पुरुषोत्तनगर येथून ऊस ट्रॉली खाली करून लोणखेड्याकडे येत असलेल्या ट्रॅक्टर (एमएच ३९, एन २९२५)वर लोणखेड्याकडून पुरुषोत्तमनगरकडे जाणारी इंडिका व्हिस्टा गाडी (एमएच ०३, एडब्ल्यू २५७१) ट्रॅक्टरवर आदळल्याने अपघात झाला.

दोन्हीही वाहने एकमेकांवर आदळल्याने जोरात आवाज झाला. त्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. त्यात इंडिका व्हिस्टा गाडीतील चारपैकी दोन व्यक्तींना दुखापत झाल्याने १०८ रुग्णवाहिका बोलावून शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Tractor Indica accident at Lonkheda Two wounded Damage to tractors and cars Nandurbar News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

ट्रॅक्टरचालकास किरकोळ दुखापत झाली. सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्थेजवळील रस्ता वर्दळीचा असून, रात्रीची वेळ असल्याने व रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात ट्रॅक्टरच्या चालकाच्या बाजूकडील पुढील व मागील दोन्हीही चाके तुटून पडली. इंडिका गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे व त्यांच्या टीमने भेट दिली. ट्रॅक्टरचालक/मालक महेंद्रसिंग गिरासे (रा. ओसर्ली, ता.जि. नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून इंडिकाचालक अमोल युवराज बडगुजर (वय ३१), अमोल बडगुजर (३९), नीलेश बच्छाव (२९), रवींद्र मिस्त्री (३३, सर्व रा. बोराडी, ता. शिरपूर) यांच्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस हवालदार तारसिंग वळवी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

मोठी बातमी! ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांचा बिगुल ५ डिसेंबरपासून; मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक ३१ जानेवारीपूर्वीच; प्रोग्राम कसा, वाचा...

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात पालकापासून हा स्वादिष्ट पदार्थ ट्राय केलात का? सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 18 नोव्हेंबर 2025

Panchang 18 November 2025: आजच्या दिवशी गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT