satana onion andolan.jpg 
उत्तर महाराष्ट्र

व्यापाऱ्यांनी आजचे लिलाव करावे; तहसीलदारांचे आवाहन 

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा

सटाणा :  सटाणा बाजार समितीमध्ये सोमवार ( ता.३०) तब्बल २१ हजार क्विंटल कांदा आवक असताना व्यापाऱ्यांनी सकाळी लिलाव सुरू केले नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रवेशद्वारात गेल्या काही तासांपासून रास्ता रोको आंदोलन छेडले. यानंतर चांदवडला तहसीलदार जितेंद्र इंगळे व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. तहसिलदारांनी आज आवक झालेल्या सर्व कांद्याचे लिलाव करून घेण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. मात्र शासनाच्या कारवाईच्या भीतीने व्यापारी कांदा लिलाव करून साठवणुकीसाठी मनाई करत होते.

व्यापाऱ्यांनी आजचे लिलाव करावे; तहसीलदारांचे आवाहन 
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आजच्या सर्व आवक झालेल्या कांद्याचे लिलाव करावे, उद्या जर पणन मंडळाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई होणार असेल तर त्याची जबाबदारी घेतली जाईल, असे हमीपत्र बाजार समिती प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना दिले जाईल. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आजचे लिलाव करावे असे आवाहन तहसीलदार इंगळे यांनी झालेल्या बैठकीत केले. 

बैठकीत इतर पदाधिकारी उपस्थित

बैठकीत आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, बाजार समिती सभापती संजय सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, संचालक केशव मांडवडे, संजय बिरारी, व्यापारी जयप्रकाश सोनवणे, श्रीधर कोठावदे, राजू बडजाते, मुन्ना लुंकड आदींसह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT