crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : कत्तलीसाठी होणारी जनावरांची वाहतूक रोखली; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने नरडाणा (ता. शिंदखेडा) पोलिसांनी पकडली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने नरडाणा (ता. शिंदखेडा) पोलिसांनी पकडली. या वाहनांत जनावरांची निर्दयतेने वाहतूक करण्यात येत होती. वाहनात चार जनावरे मृत आढळली.

पोलिसांनी ३३ जनावरे व वाहनांसह एकूण ११ लाख ५९ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Traffic of animals for slaughter was stopped by police dhule crime news)

नरडाणा ते बेटावददरम्यान दोन मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांना मिळाली. याआधारे पथक तयार करून सापळा रचला. यात नरडाण्याहून बेटावदकडे जाणारे दोन ट्रक (एमएच ४१, एजी ८७१०, एमएच ४१, एयू ४३३८) दिसले. पोलिसांनी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, न थांबता बेटावदच्या दिशेने भरधाव वाहने गेली. पोलिसांनी पाठलाग केला असता बेटावदजवळ दोन्ही वाहने थांबवून चालक व सहचालक पसार झाले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली. या वाहनांमध्ये एकूण ३७ जनावरे निर्दयपणे कोंबून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे आढळले.

या प्रकरणी वाहनचालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामनाथ दिवे, राकेश शिरसाट, विजय पाटील, भगरे, दरबारसिंग गिरासे, विजय माळी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: चार वेळा इंधन दरवाढीनंतर आज नवे दर जाहीर; तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Chhatrapati Sambhajinagar: आडूळ बसस्थानकाचा कोंडला श्वास; रस्त्यावरच केल्या जातात दुचाकी-चारचाकी पार्क; कारवाईची नागरिकांकडून मागणी

कश्यपी धरणात चौघांना जलसमाधी! पतीसह गर्भवती पत्नी अन् शेजाऱ्यांची दोन मुले बुडाली; २ वर्षाच्या बाळामुळे घटना समजली

अक्षय कुमारचा नवा एलियन थरार! नव्या सिनेमाची केली घोषणा

SCROLL FOR NEXT