Tribal Land Encrochment Notice esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : आदिवासी जमिनीवरील अतिक्रमण प्रश्‍नी नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : आदिवासींच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमणप्रश्‍नी सुझलॉनसह राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांना अनुसूचित जनजाती आयोगाने नोटीस बजावली आहे. ३० दिवसांत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नंदुरबार तालुक्यातील आदिवासींच्या जमिनीवर शासनाची पूर्वपरवानगी न घेता १५ ते १६ वर्षांपासून पवन ऊर्जा टॉवरमधून निर्माण होणाऱ्या विजेला वाहून नेण्यासाठी खांब, रस्ते, वीज जनित्र व कंपनीचे महाकाय ट्रॉली नेत इतर जमिनीचेही नुकसान झाले आहे. याप्रश्‍नी आदिवासी जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समिती लढा देत आहे. (Tribal land Encroachment give Notice Order to appear before Commission within 30 days Nandurbar News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

समितीने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली. तिची दखल घेऊन नंदुरबार जिल्हाधिकारी, मुख्य सचिव तसेच सुझलॉन एनर्जी, पुणे याचे महानिर्देशक यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

याबाबत समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २३) नवापूर चौफुली येथील देवमोगरा माता मंदिरात बैठक झाली. श्री. रामराजे सचिव, भीमसिंग पाडवी, बापू भिल, नाना भिल, साहेबराव भिल, हिरामण भिल बळिराम, भिल आप्पा बैसाणे, प्रभात पाडवी, सुखदेव भिल व शेतकरी उपस्थित होते.

आयोगाकडून आदिवासी शेतकरी यांना न्याय मिळाला नाही, तर राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे श्री. रामराजे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT