उत्तर महाराष्ट्र

ट्राय-केबलचालक वादात ग्राहकांची पिळवणूक

सकाळवृत्तसेवा

नाशिक रोड पूर्व - टेलिकॉम रेग्युलेटरी ऑर्थरटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने १ फेब्रुवारीपासून केबलधारकांना नवीन नियमावलीप्रमाणे दर आकारणी करणे अनिवार्य केले आहे. त्याप्रमाणे केबलचालकांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली आहे. दुसरीकडे पे-चॅनलचा पॅक घेऊनही शंभर फ्री चॅनल दिसत नाहीत, त्यामुळे आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. 

केंद्र शासनाने मार्च २०१७ मध्ये केबल डिजिटल लायझेशन योजना आखली. त्याप्रमाणे ग्राहक जे चॅनल्स पाहात नसेल त्याचे पैसे त्यांच्याकडून वसूल करू नये किंवा जे चॅनल्स फ्री आहेत त्याचे पैसे ग्राहकांकडून वसूल करू नये, असा मुख्य हेतू असल्याचे ट्रायने स्पष्ट केले. मात्र ट्रायने घेतलेल्या निर्णयाविरोधात केबलचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने ट्रायच्या बाजूने निर्णय दिला. आता नवीन नियमाप्रमाणे टीव्ही चॅनल्सची दरआकारणी केली जात आहे. शहरात अशा प्रकारच्या दर आकारणीबाबत ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. केबलचालकांकडून २५०, ३०० आणि ३५० रुपये असलेले पॅक ग्राहकांना दिले जात असून, यापैकी कोणताही पॅक ग्राहकाने निवडला तरी त्याला फ्री चॅनल दिसत नाही. 

काय म्हणतेय ट्राय... 
देशात एकूण ८६५ चॅनल्स आहेत. त्यापैकी ५३५ फ्री, ३३० पे-चॅनल्स आहेत. ग्राहकाला फ्री असणारे १०० चॅनल्स बघण्यासाठी १३० रुपये मोजावे लागणार असून, त्याला १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल. याव्यतिरिक्त फ्री चॅनल्स बघावायचे असेल, तर २० रुपये देऊन २५ चॅनल्स आणि जीएसटी असा दरआकारणी होईल. म्हणजेच एकीकडे फ्री चॅनल्स म्हणायचे आणि दुसरीकडे ते बघण्यासाठी पैसे मोजवेच लागणार आहेत.

केबलचालकांचे फसवे पॅक
कमी पैशात अधिक पे-चॅनल्स उपलब्ध करून देत असल्याचा गाजावाजा करणाऱ्या केबलचालकांकडून फ्री चॅनल्सवर गंडांतर आणले जात आहे. त्यामुळे दिशाभूल करून फसवणूक केली जात असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये होत आहे. 

ग्राहकांना कुठले चॅनल्स आवडतात, असा दृष्टिकोन समोर ठेवून पॅकेज दिले आहे. कमी पैशात जास्तीत जास्त पे-चॅनल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
- महेंद्र परदेशी, संचालक परदेशी नेटवर्क

ट्रायचे खरे की केबलचालकांचे खरे मानायचे, हेच नेमके समजत नाही. प्रत्येक जण आपलाच फायदा बघतो. पर्यायाने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होते.
- महेश ठाकरे, मनविसे पदाधिकारी

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT