fraud case songir fraud case songir
उत्तर महाराष्ट्र

बनावट कागदपत्रांव्दारे पठ्ठ्याने 12 वर्षे पगार लाटला!

लोटन चौधरी

सोनगीर (जि.धुळे) : बनावट दस्तऐवज (fake document) सादर करून एका शिक्षिकेचा (teacher) तब्बल बारा वर्षे पगार काढून शासनाची फसवणूक (fraud) केल्याप्रकरणी मुख्याध्यापक व संस्थाचालकास अटक करण्यात आली आहे. पण मुख्याध्यापक या शिक्षिकेवर एवढे मेहेरबान का? असा प्रश्न या निमित्ताने येथील समस्त शिक्षक अन् नागरिकांना प्रश्न पडलाय. काय घडले नेमके?

खोट्या कागदपत्रांद्वारे तब्बल १२ वर्षे मिळवून दिला पगार

विश्‍वनाथ येथील द्वारकामाई सर्वांगीण विकास संस्था संचालित जय योगेश्‍वर माध्यमिक विद्यालयात अरुण श्रीराम देवरे (रा. बिलाडी, ता. धुळे) हे शिक्षक कार्यरत होते. बारा वर्षांपूर्वी संस्थाचालक सुभाष पाटील यांनी त्यांना कामावरून कमी करून त्यांच्या जागेवर स्वतःची मुलगी चेतना पाटील हिस नियुक्ती आदेश दिले. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे बनावट आदेश व मान्यता मिळवून, तसेच बनावट दस्तऐवज सादर करून चेतनाचा १२ वर्षांचा पगारही काढून घेतला. त्याद्वारे शासनाची जवळपास ७० ते ८० लाख रुपयांची फसवणूक झाली. दरम्यान, शिक्षक देवरे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार बारा महिने चौकशी करीत व पुरावे गोळा करीत शिक्षक देवरे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संशयित संस्थाचालक सुभाष पाटील (वय ६४), मुख्याध्यापक कैलास सूर्यवंशी (वय ५१) यांना अटक करण्यात आली. तर, संशयित शिक्षिका चेतना पाटील फरारी असून, पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतनपथक अधीक्षक यांचा गुन्ह्यात सहभाग आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. ई. निकाळजे तपास करीत आहेत.

संशयित शिक्षिका मात्र फरारी

बनावट दस्तऐवज सादर करून एका शिक्षिकेचा तब्बल बारा वर्षे पगार काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी विश्‍वनाथ (ता. धुळे) येथील मुख्याध्यापक व संस्थाचालकास अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवार (ता. ६)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. दरम्यान, संशयित शिक्षिका मात्र फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुना वादातून घडली घटना...

Pune Heavy Rain: पुणेकर हैराण; पावसाने रस्ते जलमय, कामावर जाणाऱ्यांना मनस्ताप, विद्यार्थ्यांचीही झाली अडचण

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Gram Panchayat Employee: 'साताऱ्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ठिय्या'; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांपासून आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

मोठी बातमी! वीज ग्राहकांनो, ‘टीओडी’ मीटर बसविल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८० पैसे ते १ रुपयांची सवलत; सोलापुरातील २.१८ लाख ग्राहकांकडे नवे मीटर

SCROLL FOR NEXT