workar susait try 
उत्तर महाराष्ट्र

वेतन मिळाले नाही, म्हणून अंगावर ओतले रॉकेल 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः महापालिकेने दैंनंदिन स्वच्छतेचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे. परंतू गेल्या दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले नसल्याने मंगळवारी घंटागाड्यावरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. आज सकाळी पून्हा वेतन मिळावे यासाठी एक कर्मचाऱ्याने थेट अंगावार रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

महापालिकेने शहरातील दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा वॉटर ग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटीचा मक्ता दिला आहे. तीन महिने होऊन देखील शहरातील स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याने स्थायी, महासभा तसेच यावेळी नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने कंपनीच्या कामावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यात कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नसल्याचे आरोप होत होते. त्यात मंगळवारी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यापासून पगार मिळत नसल्याने घंटागाड्यावरील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून होते. 
त्यात आज सकाळी शिवाजी उद्यानातील घंटागाड्यांच्या डेपोवर कर्मचाऱ्यांनी पून्हा संप सुरू केला. यावेळी 
कंपनीच्या प्रतिनीधींनी संप करणाऱ्यांना काही जणांना काढून टाकण्याचा सांगितले. त्यामुळे यावेळी शाब्दीक 
चकमक उडाल्याने यात राजू परदेशी या कर्मचाऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे 
सकाळी घडलेल्या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेत, शहरातील कचरा संकलन करण्याचे कामाला आज सुरवात केली. कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केल्याने शहरात अनेक ठिकाणी कचरा उघड्यावर टाकण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत सर्व 85 घंटागाड्या शहरात कचरा संकलनासाठी गेल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT