Two thousand devotees have visited the Datta temple in Sarangkheda in three days.jpg 
उत्तर महाराष्ट्र

सारंगखेड : एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी उसळली भक्तांची गर्दी!

रमेश पाटील

सारंगखेडा : कोरोनाचे संकट टळो आणि आरोग्यमय राज्य राहो अशी प्रार्थना करत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सारंगखेडा ( ता. शहादा ) येथील श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिर भाविकांसाठी सोमवारी ( ता.16 ) खुले करण्यात आले. तत्पूर्वी कोरोना योद्धा ठरलेल्या देवदूत असलेल्या चार डॉक्टरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. गेल्या तीन दिवसात दोन हजार भाविकांनी दर्शन घेतले. आज एक तुलाचे नवस फेडण्यात आले. 

डॉक्टरांना भूतलावरील देवदूत मानले जाते. कोरोनाच्या कालावधीत डॉक्टरांनी रुग्णांची केलेली सेवा अवर्णनीय आहे. ही बाब लक्षात घेत येथील श्रध्दास्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिराचे दरवाजे कोरोनायोध्दा डॉक्टरांच्या हस्ते उघडण्यात आले. त्यांच्या हस्ते विडा अवसर पूजन करण्यात आले. इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो, अशी प्रार्थना बली प्रतिपदेला केली जाते. कोरोनाचे संकट टळो आणि आरोग्यमय राज्य राहो, अशी प्रार्थना करत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार येथील मंदिर उघडण्यात आले. यावेळी मंदिराबाहेर फटाक्याची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. गेल्या तीन दिवसात दोन हजार भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी बॅरीकेट्स लावण्यात आले असून रांगेत तीन फुट अंतर ठेऊन टप्प्याटप्यात भाविकांना सोडण्यात येत आहे. मास्क लावूनच दर्शनाला परवानगी दिली आहे. 

कोरोना योध्दांचा सन्मान 

कोरोना हे नाव ऐकले तरी थरकाप होतो. अशी परिस्थिती असतांना शहरामध्ये डॉक्टरांनी रुग्णालये बंद केली. अशा स्थितीत कोरोनाकाळात येथील चार डॉक्टरानी आपल्या परिसरातील रुग्णांवर रात्र, दिवस उपचार केले. कोरोनाची भिती कमी केली. त्या डॉक्टरांचा दत्त विश्वस्थांनी सन्मान केला. डॉ. सुभाष फुलंब्रीकर, डॉ.ओंकार पाटील, डॉ. फिरोज शहादा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यानिक अधिकारी सी.एम. पाटील, प्रदिप कोळी यांचा चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वस्थ अध्यक्ष अर्जून पाटील, रविंद्र पाटील, भिक्कन पाटील, अंबालाल पाटील, नरोत्तम पाटील, छोटू पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र गिरासे यांनी केले तर आभार पुरुषोत्तम आगळे यांनी मानले. 

दोन हजार भाविकांनी घेतले दर्शन 

आठ महिन्यापासून बंद असलेले येथील श्रध्दास्थान असलेले मंदिर ( ता. 16 ) सकाळी नऊ वाजता उघडण्यात आले. तीन दिवसात दोन हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. येथील दत्त प्रभू नवसाला पावतो अशी श्रध्दा असून आज सकाळी एका भाविकाचे केळीची तुलाचे नवस फेडण्यात आले असल्याचे  नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT