Dhule: Officers and teams present during inspection of seized vehicles including two-wheeler thieves. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मांजरोदचा दुचाकी चोर अटकेत; LCB कडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अमळनेर (जि. जळगाव) बसस्थानकातून दुचाकी लांबविणारा मांजरोद (ता. शिरपूर) येथील चोरटा पोलिसांच्या हाती लागला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने ही कारवाई केली. कारवाईत दोन दुचाकी हस्तगत केल्या.

मांजरोद (ता. शिरपूर) येथील स्वप्नील सुरेशसिंह राजपूत हा वापरत असलेल्या दुचाकी चोरीच्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार शोधपथकाला मांजरोद येथे रवाना केले.(Two wheeler theft of Manjrod arrested Two vehicles seized from Dhule LCB Dhule News)

स्वप्नील राजपूत याची चौकशी करून त्याच्या ताब्यातील दोन्ही दुचाकींबाबत विचारपूस केली असता त्याने अमळनेर येथील बसस्थानकातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यात बजाज सीटी १०० व होंडा सीबी हॉर्नेट या दुचाकींचा समावेश आहे.

पथकाने कारवाईतून स्वप्नील राजपूत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन्ही दुचाकी जप्त केल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या सहकार्याने उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, संतोष हिरे, मायूस सोनवणे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT