रावेर - केऱ्हाळे खुर्द येथील महिलांच्या खूनप्रकरणी संशयित कैलास गाढे, लक्ष्मण निकम यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, निरीक्षक रामदास वाकोडे व कर्मचारी. 
उत्तर महाराष्ट्र

दोन प्रेयसींचा अनैतिक संबंधातून प्रियकरांनीच केला दोघींचा खून

सकाळ वृत्तसेवा

रावेर - प्रेयसींचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केऱ्हाळे खुर्द (ता. रावेर) येथील खेडी शिवारात दोन महिलांचा तीक्ष्ण हत्याराने मंगळवारी खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासांतच संशयित दोघांना गावातून अटक केली आहे. संशयितांनी खून केल्याची कबुली दिल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केऱ्हाळे खुर्द येथील शालूबाई गौतम तायडे (वय ५७), नसीमा रुबाब तडवी (वय ४६) या सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गुरांना चारा आणण्यासाठी खेडी शेती शिवारात गेल्या होत्या. या महिला घरी न आल्याने  त्यांच्या नातेवाइकांनी रावेर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती. दरम्यान, शेती शिवारात या महिलांचे मृतदेह आढळले होते. 

पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, कर्मचारी यांच्यासह रावेर पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक सुनील कदम, मनोज वाघमारे, जितेंद्र पाटील, अजय खंडेराव, विजय जावरे, नीलेश चौधरी, भागवत धांडे, गफूर शेख, मंदार पाटील आदींनी तपासाची चक्रे फिरवून प्रथम केऱ्हाळे खुर्द (ता. रावेर) येथील कैलास गुणा गाढे (वय ५७) यास ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. सोबत लक्ष्मण किसन निकम (वय ६०) यास रात्री ताब्यात घेतले.

लक्ष्मण निकम याचे शालू तायडे हिच्याशी व कैलास गाढे याचे नसीमा तडवी हिच्याशी अनैतिक संबंध होते. दोघा महिलांचे बाहेरही अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघा संशयितांनी संगनमत करून नसीमा तडवी हिच्या गळ्यावर चाकूने वार केला, तर शालू तायडे हीचा पंपाच्या दोरीने गळा आवळला. यानंतर चाकूने वार करून ठार मारले.

याप्रकरणी दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली. या दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता, २५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT