Sarkarsaheb Rawal, Rajvardhan Kadambande felicitating Deputy Mayor Vaishali Varade on his assumption of office in the Municipal Corporation.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Deputy Mayor : वैशाली वराडेंनी स्वीकारला उपमहापौरांचा पदभार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Deputy Mayor : महापालिकेच्या उपमहापौरपदाची सूत्रे भाजपच्या वैशाली भिकन वराडे यांनी शुक्रवारी (ता. ९) स्वीकारली. तसेच सभागृहनेतेपदाची सूत्रे भाजपच्याच भारती माळी यांनी हाती घेतली. या दोघींच्या निवडीमुळे महापालिकेत महिलाराज स्थापित झाले आहे. (vaishali varade is new deputy mayor of dhule news)

नगरसेवक नागसेन बोरसे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानुसार उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात वैशाली वराडे बिनविरोध निवडून आल्या. त्यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच सभागृहनेत्या भारती माळी यांनीही महापालिकेत पदग्रहण केले.

उद्योजक सरकारसाहेब रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापौर प्रतिभा चौधरी, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, अल्पा अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, माजी उपमहापौर बोरसे, नगरसेवक हिरामण गवळी, राजेश पवार, भिकन वराडे, शिवाजी चौधरी, वैशाली शिरसाट, मोहिनी गौड आदी उपस्थित होते.

महापौर चौधरी, उपमहापौर वराडे, सभापती अग्रवाल आणि स्थायी समिती सभापती कुलेवार या महिलांकडे महापालिकेच्या कारभाराची सूत्रे असल्याने महिलाराज अनुभवास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! गुटखा, मावा विकाल तर १० वर्षांपर्यंत शिक्षा; बंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात सापडला ८२ लाखांचा गुटखा: विक्रेत्यांवर आता ‘मकोका’चीही होणार कारवाई

Panchang 21 November 2025: आजच्या दिवशी बडीशोप किंवा शतावरी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

10th CBSE Board Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! गुणवाटपाबाबत CBSEची मोठी घोषणा; जाणून घ्या नवा नियम

आजचे राशिभविष्य - 21 नोव्हेंबर 2025

Morning Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात ट्राय करा मुरमुरे अन् रव्यापासून खास पदार्थ, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT