crime esakal
उत्तर महाराष्ट्र

सलग तिसऱ्या दिवशी अक्कलकुवा शहर बंदच

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकुवा : वादग्रस्त व्हॉट्‌सॲप स्टेटस ठेवल्याने शेकडोंच्या संख्येने समाजकंटकांनी अक्कलकुवा येथे शुक्रवारी मध्यरात्री तुफान दगडफेक करून दुचाकीसह चारचाकी वाहनांचे नुकसान केले होते. शनिवार पासून अक्कलकुवा शहरात घटनेचा निषेध नोंदवत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले आहेत.

दरम्यान, अक्कलकुवा पोलिसांनी घटनेचा गुन्हा दाखल करून संशयितांची धरपकड सुरू केली आहे. मात्र, काही संशयित पोलिसांना अद्यापही मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मध्यरात्री दहशत पसरविणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्थ नागरिकांनी सलग तिसऱ्या दिवशीही शहर कडकडीत बंद पाडून सर्व व्यवहार बंद ठेवले.

शहरात दगडफेक व वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेत एकूण ४८ संशयितांवर गुन्हा दाखल झाला असून, आतापर्यंत २८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील २४ संशयितांना न्यायालयाने गुरुवार (ता. १६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. घटना घडल्यानंतर तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी पंचनामे न केल्याने नागरिकांचे समाधान होत नव्हते, तर पोलिसांनी पंचनामे करायला भाग पाडले. या अनुषंगाने सतत तीन दिवस व्यापारही कडकडीत बंद ठेवले आहेत.

दरम्यान, सोमवारी अक्कलकुवा शहरातील रुणाने पुन्हा अक्कलकुव्यातील वाहनांच्या तोडफोडीचा फोटो व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवून नुकसानग्रस्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी पुन्हा एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

Mumbai: मुंबईत गणरायाच्या आगमनात संतापजनक प्रकार! मिरवणुकीत इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणावाचे वातावरण

Marathi News Live Updates : पुण्यातील माणिक बागेत अपघात; युवतीचा मृत्यू

ST Bus : सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला! एसटीच्या प्रासंगिक करार भाड्यात ११ ते १९ रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT