उत्तर महाराष्ट्र

समृद्ध गाव स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील 12 गावे पात्र

निलेश पाटील

शनिमांडळ: सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत जलसंधारनातून जलसमृद्धी घडवण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील 102 गावांनी श्रम घेतले,सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत 30 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांची निवड पाणी फाऊंडेशन कडून समृद्ध गाव स्पर्धेसाठी केली आहे,त्यातूनच प्रेरणा घेत कोविड 19 ची परिस्थिती असतानाही ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेत पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धेत नंदूरबार तालुक्यातील 12 गावांनी पहिल्या टप्पातील कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.


ज्ञानसंधारणातून समृद्धी हे ब्रीदवाक्य असलेल्या समृद्ध गाव स्पर्धेत जलव्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे,कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यावर या स्पर्धेत भर दिला आहे,यासोबतच मृदासंधारण,वृक्ष व जंगल यांची वाढ करणे,संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे,गावकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या सारख्या विविध विषयांवर या स्पर्धेत गुण देण्यात आलेले आहेत.पहिल्या टप्प्यात 120 गुणसाठी काम करणे अपेक्षित होते यापैकी 70 गुण मिळवणाऱ्या गावांना मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करणायत येनार आहे,नंदुरबार तालुक्यातील 12 गावांनी 70 व त्यापेक्षा अधिक गुण मिळवंले आहेत,या गावाच्या नावाची घोषणा येत्या 22 तारखेला मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,अमीर खान,किरण राव व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे.

"वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील अनेक गावांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे,समृद्ध गाव स्पर्धेतही तालुक्यातील गावे काम करीत आहेत,प्रशासनाच्या वतीने या गावांना सर्व सहकार्य व प्रोत्साहन दिल्या जात आहे"
-अशोक पटाईत,गटविकास अधिकारी,नंदुरबार

" कोविड 19 ची परिस्थिती असल्याने अनेक अडचणी होत्या,ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यातही नेटवर्क,वीज यासारख्या समस्या येत असतानाही गावकऱ्यांनी जिद्द दाखवत प्रशिक्षण पूर्ण केली व आपले गाव समृद्ध करण्याच्या दृष्टीने कष्ट घेतले,गावकर्याचे हेच कष्ट आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात.
-निलेश पाटील तालुका समनव्यक,पाणी फाऊंडेशन

सत्यमेव जयते समृद्ध गावं मिनी स्पर्धा पात्र गांवे 

1.आसाने
2.जळखे
3.न्याहाली
4.बलदाने
5.कारली
6.बाह्यणे
7.धमडाई
8.केसरपाडा
9.वावद
10.रनाळे खुर्द
11.उमरदे खुर्द
12.बिलाडी
 
संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Update: शिंदे गटाकडून फोडोफोडीचे प्रयत्न... ठाकरे गटाचा नगरसेवक खरंच जंगलात लपला? खरं काय? मुंबईच्या राजकारणात खळबळ!

IND vs NZ: भारताला वनडेत सतावलेल्या 'त्या' खेळाडूला न्यूझीलडने T20 मालिकेसाठीही दिली अचानक संधी, कारण घ्या जाणून

नितीन नवीन माझे बॉस! PM मोदींनी भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा

धुमधडाक्यात झाला प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा; कोण आहे अभिनेत्याची होणारी सून? फोटो पाहून रंगली भलतीच चर्चा

अजित आगरकरचे धक्कातंत्र! Virat Kohli, रोहित शर्मा यांना बसणार मोठा फटका, BCCI कडे पाठवलाय प्रस्ताव, आता...

SCROLL FOR NEXT