Bhatu Vagh and Motilal Vagh making wooden tagtrao
Bhatu Vagh and Motilal Vagh making wooden tagtrao  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : यात्रोत्सवात लाकडी तगतरावाची ‘क्रेझ’; वाघ बंधू व्यस्त

जगन्नाथ पाटील

Dhule News : हौशेला मोल नसते. हौस पुरी करण्याची सर्वाधिक मोठी जागा असेल तर गावाची यात्रा. काही घ्यायचे असेल तर यात्रेत घेऊ. फिरायची हौस अपूर्ण असेल तर यात्रेत फिरण्याची हौस पूर्ण करून घेऊ, असे म्हणणाऱ्यांची आजही कमी नाही. (villager is making a special wooden tagtrao for village pilgrimage from wagh brothers dhule news)

यात्रा म्हटली म्हणजे उघड्यावरील तमाशा आला. तमाशा म्हटला म्हणजे त्यातील कलाकारांची मिरवणूक निघालीच पाहिजे. ही मिरवणूकही तगतरावमधूनच निघाली पाहिजे. त्याशिवाय यात्रेची मजा आणि हौस पूर्णत्वास जात नाही.

काळ बदलला पण लाकडी तगतरावाचे वेड आजही साऱ्यांनाच आहे. गावाच्या यात्रेसाठी येथील ग्रामस्थ खास लाकडी तगतराव बनवून घेत आहेत. त्यासाठी तामसवाडी (ता. धुळे) येथील वाघ बंधू महिन्यापासून मेहनत घेत आहेत.

यात्रेसाठी हवा लाकडीच तगतराव

येथील ग्रामदेवता भवानी मातेची यात्रा अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भरते. यात्रा अवघी पाच दिवसांवर आली आहे. या वर्षी यात्रेनिमित्त गावात लाकडी तगतराव फिरणार आहे. येथील युवकांना लाकडीच तगतराव हवा होता. यात्रेत लाकडीच तगतराव फिरला पाहिजे यासाठी त्यांनी लोकवर्गणी गोळा केली आहे. यात्रा तोंडावर आल्याने ग्रामस्थांना तगतरावचे वेध लागले आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

तामसवाडीचे वाघ बंधू बनवितात तगतराव

तामसवाडी येथील भटू वाघ आणि मोतीलाल वाघ हे साठी ओलांडलेली वृद्ध भावंडे आजही लाकडी तगतराव बनविण्याची कला जोपासून आहेत. ते सध्या कापडणे, पारोळा आणि तामसवाडी येथील तगतराव बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत.

त्यांनी आयुष्यात बरेचसे तगतराव बनविले. लाकडी तगतराव बनविणे परवडत नाही म्हणून बरेचसे ग्रामस्थ लोखंडी तगतराव बनवून घेतात. पण अस्सल परंपरा जोपासणारे ग्रामस्थ आजही लाकडी तगतराव बनविण्यासाठी धडपडत असल्याचे भटू वाघ यांनी सांगितले.

दोन लाखांचा लाकडी तगतराव

एकविसाव्या शतकातही पारंपरिक प्रथा आणि परंपरा टिकविण्यासाठी बहुतांश ग्रामस्थ धडपडत असतात. प्रथा टिकवून ठेवण्यासाठीच लाकडी तगतराव बनविणे सुरू असल्याचे मिस्तरी भटू वाघ यांनी सांगितले. येथील लाकडी तगतराव सुमारे दोन लाखांत पडणार आहे. कापडणेसह तामसवाडी आणि पारोळा येथील तगतरावही बनविणे सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT