नाशिक - जुने नाशिक परिसरातील खैरे गल्लीत बुधवारी रात्री कोसळलेला वाडा.
नाशिक - जुने नाशिक परिसरातील खैरे गल्लीत बुधवारी रात्री कोसळलेला वाडा. 
उत्तर महाराष्ट्र

खैरे गल्लीत वाडा कोसळला

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक - खैरे गल्ली येथील नाकील वाडा कोसळण्याची घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. भद्रकाली पोलिसांसह अग्निशमन पथकाने वाड्यातील सहा जणांची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत वाड्याचा धोकादायक भाग उतविण्याचे काम सुरू होते.

पावसाने खैरे गल्लीतील नाकील वाडा धोकादायक झाला होता. बुधवारी अचानक वाडा कोसळण्याचा आवाज झाला. वाड्यात कुणी राहात नसले तरी त्यास लागून असलेल्या काळे वाड्यात मात्र काळे कुटुंबीय राहात होते. नाकील वाड्याचा काही भाग वाड्याच्या मागील बाजूस कोसळला, तर काही भाग काळे वाड्यावर कोसळल्याने काळे कुटुंबीय त्यात अडकले. भद्रकाली पोलिस बिट मार्शल प्रवीण पगारे, भरत शिर्के, संजय पाटील व प्रकाश शिंदे काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काळे वाड्यात अडकलेल्या वेदिका अरविंद काळे (वय २७), मंगला शिवाजी काळे (वय ५३), तनिष्क अरविंद काळे, हर्षदा अरविंद काळे अशा चौघांची सुटका करीत त्यांना सुरक्षित स्थळी नेले.

अग्निशमन दलाने नाकील वाड्याच्या मागील बाजूस अडकलेल्या दोन वृद्ध महिलांची सुटका केली. दोन्ही विभागाच्या प्रयत्नांमुळे सहा जणांचे प्राण वाचले. रात्री उशिरापर्यंत वाड्याचा अन्य धोकादायक भाग उतरविण्यात आला. काळे वाडाही पूर्णपणे धोकादायक असून, तोसुद्धा कधीही कोसळण्याची शक्‍यता महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तशा सूचनाही काळे कुटुंबीयांना दिल्या. नाकील वाड्याचे मालक राजू नाकील सध्या विहितगाव येथे वास्तव्यास आहे. गेल्या दहा ते १२ दिवसांत सुमारे १३ वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

Appi Aamchi Collector: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज केंद्रेची 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Jayant Patil : मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक व महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड; जयंत पाटील

Team India squad T20 WC : सूर्यकुमार, बुमरावर भारताचे भवितव्य! टी-20 वर्ल्ड कपबाबत युवराज सिंगचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT