Water entering the Yatrasthal from the Panzra river. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विविध हंगामी व्यावसायिकांचे नुकसान; पांझरा नदीतील पाण्याचा फटका; यात्रोत्सवापूर्वी आर्थिक संकट

Dhule News : धुळे, शिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यातील टंचाई दूर करण्यासाठी पांझरा नदीत सोडण्यात आलेले पाणी व्यावसायिकांसाठी नुकसानकारक ठरले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे, शिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यातील टंचाई दूर करण्यासाठी पांझरा नदीत सोडण्यात आलेले पाणी व्यावसायिकांसाठी नुकसानकारक ठरले. श्री एकवीरादेवीचा यात्रोत्सव २२ एप्रिलला चैत्र पौर्णिमेपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर हंगामी व्यावसायिक काही दिवसांपासून पांझरा नदीपात्रात दाखल होत आहेत. (water released into Panzara river to alleviate shortage in Dhule Shindkheda and Amalner talukas proved detrimental to businessmen)

त्यांच्याकडून मोठे पाळणे लावण्याचे काम सुरू असतानाच अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन मंगळवारी (ता. ८) पहाटे धुळ्यापर्यंत पोचले. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले. पांझरा नदीत पाणी येणार याची सूचना नसल्याने मंगळवारी पहाटे व्यावसायिकांनी निवासासाठी उभारलेल्या तात्पुरत्या झोपडीत पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे साहित्य पाण्याखाली आले.

हंगामी व्यावसायिक उघड्यावर पडले. परिणामी, यात्रा सुरू त्यांना आर्थिक फटका बसला. पांझरा नदीकाठावरील गावांना टंचाईची झळ बसत असल्याने ६ एप्रिलला अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. तीन दिवसांनंतर हे पाणी मंगळवारी पहाटे शहरातील पांझरा नदीत आले.

सुरुवातीला पाण्याचा प्रवाह तसा कमी होता. मात्र, नंतर बऱ्यापैकी पाणी गुडघाभर येण्यास सुरवात झाली. यात्रोत्सवासाठी पाळणे, झोके आणि अन्य साहित्य घेऊन हंगामी व्यावसायिक पांझरा नदीपात्रात दाखल होत आहेत. (latest marathi news)

पाळण्याजवळ व्यावसायिक नासीरभाई पठाण, सिकंदर पठाण (रा. शहादा, जि. नंदुरबार), नवाज पठाण, तनवीर तडवी (रा. शिरपूर) यांनी तात्पुरत्या झोपड्या तयार केल्या होत्या. त्यात नदीपात्रातील पाणी शिरले. तसेच पाळण्याचे साहित्यदेखील पाण्यात बुडाल्याने त्यांचे नुकसान झाले. झोपडीत पहाटेच्या सुमारास पाणी शिरल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली.

संसारोपयोगी विविध साहित्य पाण्याबाहेर काढण्यासाठी गोंधळ झाला. झोपडीतील सर्वच आवश्यक साहित्य सुरक्षितस्थळी ठेवण्यासाठी दमछाक झाली. त्यांनी भरून ठेवलेले दहा हजारांचे धान्य पाण्यात ओले झाले. पीठ, मीठ, तेलासह सर्वच वस्तूंचे पाण्यामुळे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT