खैरवाडी - गावात टॅंकरद्वारे पहिल्यांदा पाणी आल्यांनतर या चिमुरडीच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले.
खैरवाडी - गावात टॅंकरद्वारे पहिल्यांदा पाणी आल्यांनतर या चिमुरडीच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले. 
उत्तर महाराष्ट्र

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा खैरवाडीत पाण्याचा टॅंकर

पोपट गवांदे

इगतपुरी शहर - खैरवाडी (ता. इगतपुरी) गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना चक्क विहिरीत उतरून पाणी भरावे लागत असल्याचे वृत्त मंगळवारी (ता. ७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा खैरवाडीत पाण्याचा टॅंकर पाठविल्याने येथील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. ‘सकाळ’ व श्रमजीवी संघटनेचे आभारही मानले.

पाण्याचा टॅंकर सुरू करण्यासाठी रस्त्याची अडचण असल्याने ग्रामस्थ व श्रमजीवी संघटनेने श्रमदान करून तात्पुरता रस्ता बनवला. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधून तातडीने मंगळवारी (ता. ७) तेथे छोट्या ट्रॅक्‍टरने पाण्याचा टॅंकर सुरू केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच येथे टॅंकर आल्याने आदिवासी ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले. आगामी काळात तेथे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल, असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच खैरेवाडी गावाला पाण्याचा टॅंकर देऊन प्रशासनाने दखल घेतली. या गावाला तृषार्तता राहू नये म्हणून श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले. ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाचे आम्ही आभार मानतो.
- भगवान मधे, सरचिटणीस, श्रमजीवी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT