Drought
Drought 
उत्तर महाराष्ट्र

दुष्काळाची दाहकता पाहा! 300 लिटर पाणी चक्क चोरून नेले...

सकाळवृत्तसेवा

मनमाड  - घरफोडीत ऐवज चोरीला जाणे ही तशी नित्याची बाब. पोलिस डायरीचे रकानेच्या रकाने अशा प्रकारांनी भरलेले बघावयास मिळतात. पण, मनमाडमध्ये मात्र एका घरफोडीत गुन्हा दाखल न होताही सर्वांची झोप उडविली आहे. या प्रकरणात चोरट्यांनी ऐन दुष्काळात चक्क तीनशे लिटर पाण्यावरच डल्ला मारला असून, चोरट्यांनाही दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

पाणीटंचाई ही खरेतर मनमाडच्या पाचवीलाच पुजलेली. यंदा मात्र ती इतकी तीव्र झाली आहे, की चोरट्यांनाही किमती ऐवजापेक्षा पाणीच चोरून नेण्याचे धाडस करावे लागले. येथील श्रावस्तीनगर भागातील विलास अशोक आहिरे यांनी घरावरील टाकीत साठविलेले तब्बल तीनशे लिटर पाणी या चोरट्यांनी लांबविले. पालिकेतर्फे २० दिवसांआड म्हणजे महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो. नळांना येणारे पाणीच २० दिवसांसाठी साठवून ठेवावे लागते. 

दुसरीकडे शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्या आणि त्यात लुटला जाणारा ऐवज, या घटनाही नित्याच्याच आहेत. त्यातच आता तर पाणीदेखील सुरक्षित राहिलेले नाही. श्री. आहिरे यांच्या घरावरील टाकीची साठवणक्षमता पाचशे लिटर आहे. त्यांपैकी तीनशे लिटर पाणी चोरट्यांनी पळविले. त्यामुळे आता आमच्या कुटुंबाला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे आहिरे यांनी सांगितले. दरम्यान, पाणीटंचाईची तीव्रता आणि पाण्याशी संबंधित विषय असल्याने आहिरे यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे टाळले असले, तरी ही बाब गंभीर असून, भविष्यात पाण्यासाठी कलह होऊ शकतो. हेच या प्रकरणावरून दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT