Widow tradition closed in Nimbhora esakal
उत्तर महाराष्ट्र

निंभोऱ्यात विधवा प्रथा बंद! ग्रामसभेत ठराव मंजूर; महिलांमध्ये समाधान

विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व प्रबोधन करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : विधवा प्रथा बंद करण्याचा हेरवाड (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय निंभोरा (ता. अमळनेर) येथील ग्रामसभेनेही घेतला असून, तसा ठराव करून सर्वप्रथम या मोहिमेची सुरवात केली. मंगळवारी (ता. १) अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ग्रामसभेस मोठ्या संख्येने विधवा महिला उपस्थित होत्या. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे, तर विधवा महिलांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

दर्शना पवार लिखित संघर्षमूर्ती अहिल्याआई या पुस्तकाचे लोकार्पण झाले. यासाठी सरपंच पायल पाटील यांनी आपल्या राजरथ फाउंडेशनतर्फे १११ पुस्तके उपलब्ध करून दिली. सरपंच पाटील यांनी अहिल्यादेवींचा आदर्श घेत आपणही आपल्या गावात विधवांना सन्मान व समानता मिळवून देऊ या. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवे काढणे आदी चुकीच्या प्रथांना पायबंद घालून विधवांना धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रस्थान देऊ, असे आवाहन केले.

कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे, म्हणूनच विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व प्रबोधन करण्याचा ठराव करण्यात आला.

उपसरपंच आलेश धनगर, माजी उपसरपंच समाधान धनगर, चंद्रकलाताई पाटील, सुनील पाटील, भाग्यश्री पाटील, कविता कोळी, जितू वाडेकर, सुभाष पारधी, संजय न्हाळदे, अनिल पाटील, दिलीप पाटील, तुषार पाटील, कपिल धनगर, ग्रामसेवक नितीन पाटील, रवींद्र पाटील, रतिलाल बाविस्कर आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या निर्णयामुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT