Wifes ear cut off for alcohol by husband at Bhatpura dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अन त्यानं दारूसाठी कापला बायकोचा कान

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीच्या कानातील दागिना काढून घेण्यासाठी नवऱ्याने तिचा कानच कापून काढला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीच्या कानातील दागिना काढून घेण्यासाठी नवऱ्याने तिचा कानच कापून काढला. ही घटना ५ जानेवारीला सायंकाळी भाटपुरा (ता. शिरपूर) येथे घडली. (Wifes ear cut off for alcohol by husband at Bhatpura dhule crime news)

जखमी महिलेवर उपचार सुरू असून, तिने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पतीविरोधात थाळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जागृती घनश्याम राठोड (वय ३०, रा. भाटपुरा) असे जखमी महिलेचे नाव आहे.

५ जानेवारीला सायंकाळी पती घनश्याम काळू राठोड (वय ३५) घरी आला. ‘मला दारू पिण्यासाठी पैसे दे’ अशी त्याने मागणी केली. तिने माझ्याकडे पैसे नाहीत, मी कुठून देऊ, असे उत्तर दिले.

त्यावर संशयिताने तिला कानातला दागिना काढून देण्यास सांगितले. तिने नकार दिल्यामुळे घनश्याम राठोडने हातात चाकू घेऊन तिचा डावा कान कापून काढला. कानातून रक्तस्राव झाल्याने ती गंभीर जखमी झाली.

तिचा आरडाओरडा ऐकल्याने शेजारी धावत आले. त्यांनी जागृतीला रुग्णालयात दाखल केले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पती घनश्याम राठोड याच्याविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. हवालदार संजय धनगर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: मॉन्सूनच्या वाटचालीस वातावरण पोषक; विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

Panchang 27 May 2026 : पद्मिनी एकादशीसह बुधवारी खास योग! जाणून घ्या संपूर्ण पंचांग

आजचे राशिभविष्य - २७ मे २०२६

करिअर वेध : पराकोटीचा ध्यास

SCROLL FOR NEXT