animal esakal
उत्तर महाराष्ट्र

Vaccination Drive : लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

धुळे : केंद्र सरकारच्या सहकार्याने देशात लाळ खुरकूत लसीकरण (vaccination) फेरी राबविली जात आहे. (With help of central government salivary gland vaccination round for animal is being implemented in country dhule news)

सध्या फेरी तीनअंतर्गत सुमारे चार लाख लसमात्रा प्राप्त असून, जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्याकडील सर्व गायी, म्हशी, बैल, रेडे, तीन महिन्यांवरील वासरे/पारडे यांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रमेश शिंदे यांनी केले.

जिल्ह्यातील गो/म्हैसवर्गीय पशुधनाचे विषाणूजन्य लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरणासाठी लसमात्रा पशुवैद्यकीय संस्थास्तरावर वाटप करण्यात आल्या आहेत. हा आजार पशूंसाठी मोठ्या प्रमाणात हानी पोचवितो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तोंडात/पायात जखमा, ताप, गर्भपात, लहान वासरात मरतूक, उत्पादनात प्रचंड घट आदी परिणामदृश स्वरूपात आजार दिसतो. त्यामुळे पशू व पर्यायाने पशुपालकांचे मोठे नुकसान होते. लसीकरण थंड वेळेत करणे फायदेशीर असल्याने सर्व पशुपालकांनी यासाठी सजग राहून लसीकरण करून घ्यावे.

लाळ खुरकूत या घातक पशू आजारापासून लसीकरणाने प्रतिबंध करण्यासाठी पशुपालकांनी नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशूंना या आजारापासून मुक्त ठेवावे, असेही डॉ. शिंदे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT