crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बनावट कागदपत्रांद्वारे हडपली महिलेची जमिन; 5 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बनावट कागदपत्रे तयार करून महिलेची जमीन हडपून तिच्यावर कर्ज घेत फसवणूक केल्याच्या संशयावरून पाच जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Woman land grabbed by fake documents dhule crime news)

पमाबाई तथा गुलाबकोर विठ्ठलसिंह राजपूत (वय ५८, रा.आमोदा ता.शिरपूर) यांनी फसवणुकीबाबत पोलिसांत फिर्याद दिली. डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ कालावधीत येथील कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भोरखेडा (ता.शिरपूर) शिवारात गट नंबर १३४/२ मध्ये श्रीमती.राजपूत यांची सामाईक मालमत्ता आहे. तिचे परस्पर खोटे दस्तऐवज तयार संशयित जयपालसिंह राजपूत (रा.भोरखेडा) याने त्या कागदपत्रांचा वापर करून बँकेतून कर्ज काढले. हा प्रकार संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने केल्याचे श्रीमती.राजपूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

संशयित जयसिंह राजपूत, जयपालसिंह राजपूत (दोघे रा.भोरखेडा), जितेंद्रसिंह उदेसिंह राजपूत (रा.आमोदा), प्रतिज्ञापत्र लिहून देणारी अज्ञात महिला, तिला ओळख देणारा अज्ञात व्यक्ती व जी.एस.शिरसाट नामक व्यक्ती यांच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT