Women and girls celebrated Festival of Hartalika 
उत्तर महाराष्ट्र

महिला व कुमारीकांकडून हरतालिका व्रत उत्साहात साजरा

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : वणी व परिसरातील मंदिरांमध्ये शिव पार्वतीच्या मंत्रघोषात हरतालिका व्रत उत्साहात साजरे करण्यात आले. 
आज सकाळपासूनच विवाहित स्त्रियांबरोबर कुमारिकांनी आकर्षक वेशभुषा, शांगशृंगार करुन पुजेला जाण्याची लगबग सुरु होती. पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले. या आख्यायिकेनुसार आपल्यालाही उत्कृष्ट पती मिळावा, यासाठी कुमारीकांनी तसेच लाभलेला पती दीर्घायुषी आणि आरोग्यवान होऊन आपल्यासाठी अनुकूल व्हावा यासाठी महिलांनी हे व्रत करीत असल्याचे सांगितले.

येथील अन्नपूर्णा सभामंडप, देवनदीवरील निळकंठेश्वर महादेव मंदीर, जगदंबा देवी मंदीर, शिंपी समाज मंगलकार्यालय, संताजी मंगल कार्यालय आदी ठिकाणी पुरोहितांच्या हस्ते पौरोहित्य करवून घेत त्यांच्याकडून हरतालिका व्रतामागची संकल्पना समजावून घेत कहाणीचे श्रवण केले. पूजेवेळी आरती, धूप, उदबत्ती यामुळे वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. हरतालिकेचा संपूर्ण दिवस उपवास करीत महिलांनी सायंकाळी उशीरा व्रताची सांगता करीत उपवास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Tehsildar Death : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केजचे तहसीलदार जागीच ठार, महसूल विभागात शोककळा

Petrol Price Today: जागतिक बाजारात तेलाचे भाव घसरले! आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या ताजे दर

'मला 3 महिने कोंडून ठेवलं आणि...' सुप्रिया पाठारेंनी सांगितला धक्कादायक किस्सा, म्हणाल्या...'बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार- हर्षवर्धन सपकाळ

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

SCROLL FOR NEXT