उत्तर महाराष्ट्र

पाय गमावल्यानंतरही ‘रॅम्पवॉक’द्वारे जिंकले

चेतना चौधरी

धुळे - महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकतानाच अपघातात दोन्ही पाय गमावलेली येथील यामिनी अनिल सिसोदेने सौंदर्य स्पर्धेच्या व्यासपीठावर प्रभावीपणे रॅम्पवॉक करत उपस्थितांची मने जिंकली. पुणे येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत तिला महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी पुरस्काराने गौरविण्यात आले.

जिद्दी, धैर्यशील यामिनीची ही कामगिरी तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरते आहे. वयाच्या अठरा वर्षांपर्यंत शाळा- महाविद्यालयातील अनेक स्पर्धा गाजविलेली यामिनी धुळे ‘बायपास’जवळील मुंबई-आग्रा महामार्गावर कडेला उभी होती. तिला ट्रकने चिरडले. या अपघातात तिचे दोन्ही पाय कापले गेले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, जीव तर वाचला ना अशी समजूत घालत नव्याने मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा निर्धार यामिनीने केला. ती ‘एसएसव्हीपीएस’ संस्थेच्या डॉ. पा. रा. घोगरे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. 

पुरस्कारामुळे आनंद  
अपघातानंतर कुटुंबीयांकडून यामिनीची अधिक काळजी घेतली जाऊ लागली. अवघड शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम पाय यामिनीला बसविण्यात आले. नंतर दीड वर्षांनी धुळ्यात सौंदर्य स्पर्धा झाली. त्याद्वारे राज्यस्तरावर तिची निवड झाली. खानदेश अहिराणी कस्तुरी मंचतर्फे झालेल्या या स्पर्धेत मिळालेल्या संधीचे सोने करीत यामिनीने प्रभावी व्यक्‍तिमत्वाचा किताब पटकावीत शौर्य पुरस्काराचा सन्मानही मिळाला. मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे यांच्यामुळे आत्मविश्‍वास दुणावल्याचे, तसेच आयुष्यात येणारी संकटे आपल्यासाठी नवी संधी असते, असे  यामिनी सांगते. 

अपंगांसाठी काम करणार 
कृत्रिम पायांनी चालू शकत असलो तरी त्यांची किंमत ८५ हजार ते अडीच लाखापर्यंत असते. ते सर्वच पीडितांना परवडत नाही. त्यामुळे अपंगांसाठी कृत्रिम पाय अल्पदरात कसे उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यामिनी सांगते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT