Population
Population 
उत्तर महाराष्ट्र

नसबंदीत पुरुष उदासीनतचे आरोग्यसमोर आव्हान

नरेश हाळणोर

पुरुषी मानसिकता आजही प्रबळ; पुरुष नसबंदीत पेठ, सुरगाणा आघाडीवर
नाशिक - लोकसंख्यावाढीला लगाम घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची मोहीम राबवली जाते. मात्र, आजही पुरुषांपेक्षा महिलाच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. यातून पुरुषी मानसिकतेची उदासीनताच अधोरेखित होते. असे असले, तरी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुके म्हणून गणल्या जात असलेल्या पेठ व सुरगाणा या तालुक्‍यांत महिलांच्या बरोबरीने पुरुषांनीही नसबंदी केल्याची बाब विशेष उल्लेखनीय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अवाढव्य वाढत असलेल्या शहरांतील पुरुषांमध्येही नसबंदीची जनजागृती करणे, हेच येत्या काळात आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असेल.   

देशासमोर लोकसंख्यावाढीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून गेल्या काही वर्षांपासून शासनाने ‘हम दो हमारे दो’साठी आवाहन करीत कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा उपक्रम देशभर राबविला जात आहे. कुटुंबवाढीत प्रमुख स्रोत असलेल्या पुरुषांनाही नसबंदीसाठी आवाहन करण्यात येते; परंतु आजही नसबंदी करण्यास पुरुषी मानसिकतेत उदासीनताच दिसून येते. अर्थात, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा भार महिलांवर असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. पुरुषांत नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठीचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. 

देशात कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात महाराष्ट्र जसा अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे राज्यात नाशिक जिल्ह्याचेही स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्‍यांपैकी त्र्यंबकेश्‍वर (२१७), पेठ (३५२), सुरगाणा (४३०) या तालुक्‍यांत पुरुष नसबंदीचा शतकी आकडा आहे. गतवर्षात जिल्हाभरात एक हजार १२८ पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया झाली आहे.

नियंत्रित लोकसंख्येसाठी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसह अनेक पर्यायांची उपलब्धता आहे. आरोग्य विभागातर्फे सातत्याने जनजागृतीवर उपक्रम 
राबविले जातात. महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण नसबंदीमध्ये कमी आहे. विशेषतः शहरी भागात अत्यंत कमी आहे. 
- डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, बाह्य कक्ष, जिल्हा रुग्णालय, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT