dumper & Motorcycle accident esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : डंपरखाली चिरडून तरुण ठार; मुलगी जखमी

सचिन पाटील.

शिरपूर (जि. धुळे) : भरधाव डंपरखाली (Dumper) चिरडल्याने तरुण ठार (death), तर मुलगी गंभीर जखमी (Injured) झाली. हा अपघात रविवारी (ता. १२) दुपारी साडेचारला वाडी बुद्रुक (ता. शिरपूर) गावाजवळ घडला. मृत व जखमी बापलेक असून, शेवाळे (ता. साक्री) येथील रहिवासी आहेत. नातेवाइकांना भेटण्यासाठी जात असताना, हा अपघात (Accident) झाल्याचे समजते. (Young man killed girl injured in dumper accident Dhule Accident News)

शेवाळी येथील सागर भीमराव कोळी (वय ३२) यांच्या चुलत शालकाचा विवाह १२ जूनला वाल्मीकमगरमध्ये होता. त्यासाठी ते मुलगी दिव्या (वय १४) हिच्यासह दुचाकीने आले होते. लग्न आटोपून दुपारी साडेचारला ते वाडी खुर्द (ता. शिरपूर) येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. वाडी बुद्रुक येथील वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. त्या वेळी दोघेही रस्त्यावर पडले. डंपरखाली चिरडून सागर कोळी जागीच ठार झाले. दिव्या गंभीर जखमी झाली. तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून धुळ्याला हलविले आहे. अपघातानंतर डंपरही उलटला. सागर कोळी खासगी वाहनचालक होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. शहर पोलिसांत अपघाताची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazil vs Norway : ब्राझील वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर! Erling Haaland चे दोन भन्नाट गोल अन् नॉर्वेकडून १९९८ सालची पुनरावृत्ती...

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

SCROLL FOR NEXT