Ujjwal Kulkarni felicitating Akash Dusane at Devpur branch of Dhule Jalgaon Janata Cooperative Bank. Neighbors Naina Dusane, Chandrakant Dusane, Dr. Parag Deore et all
Ujjwal Kulkarni felicitating Akash Dusane at Devpur branch of Dhule Jalgaon Janata Cooperative Bank. Neighbors Naina Dusane, Chandrakant Dusane, Dr. Parag Deore et all esakal
उत्तर महाराष्ट्र

Kidney Transplant News : किडनी प्रत्यारोपणातून तरूणाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा

धुळे : आर्थिक अडचणीमुळे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत चिंताग्रस्त धुळे शहरातील तरूण रूग्ण व त्याच्या परिवाराला जळगाव जनता सहकारी बँकेच्या धुळे देवपूर शाखेने मदतीचा हात दिला.

बँकेच्या अविनाशी आरोग्य मित्र योजनेच्या पाठबळामुळे तरूण रूग्णावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तरूणाबरोबर त्याच्या आई, वडिलांचा जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४४ व्या वर्धापदनदिनानिमित्त बँकेच्या देवपूर शाखेत सत्कार करून आनंद व्दीगुणीत केला आहे. (Young man life is saved through a kidney transplant help from Jalgaon Janata Cooperative Bank Acknowledgement Dhule News)

येथील दुसाने परिवारातील तरूण मुलगा आकाश दुसाने याच्यावर वैद्यकीय सल्लानुसार किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करायचे ठरले. परंतु, त्यांच्यापुढे आर्थिक समस्येचा डोंगर उभा राहिला. अनेक ठिकाणी पायऱ्या झिजवल्यावरही त्यांना पुरेसे आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नव्हते.

अशा विवंचनेत असताना दुसाने परिवाराने जळगाव जनता सहकारी बँकेच्या देवपूर शाखेस संपर्क साधला. त्यांना बँकेचे देवपूर शाखा व्यवस्थापक उज्ज्वल कुळकर्णी यांनी योग्य मार्गदर्शन करून धीर दिला व या माध्यमातून बँकेच्या अविनाशी आरोग्य मित्र योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामधून दुसाने परिवाराला उपलब्ध झालेल्या दहा लाख रूपयांच्या कर्जाऊ रकमेतून आई नैना दुसाणे यांनी किडनी दान करून मुलगा आकाशला जीवदान दिले. औरंगाबाद येथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सोनियाचा दिन

जळगाव जनता सहकारी बँकेचा ४४ वा वर्धापनदिन व त्यात आकाश दुसानेला जीवदान मिळाल्याने त्याचा व आई नैना दुसाणे, वडिल चंद्रकांत दुसाणे यांचा बँकेच्या दत्तमंदिर चौक परिसरातील देवपूर शाखेत बँकेचे संचालक डॉ. पराग देवरे, डॉ. प्राजक्ता देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेमुळे आजचा सोनियाचा दिन पाहावयास मिळत असल्याची भावना आई नैना दुसाणे, आकाश दुसाणे याने व्यक्त केली.

त्याबद्दल दुसाणे परिवाराने जळगाव जनता सहकारी बँकेचे आभार मानले. बँकेचे संचालक डॉ. पराग देवरे यांनी बँकेच्या सामाजिक बांधिलकीबरोबर राबविण्यात येणारे उपक्रम व लाभ योजनांची माहिती मनोगतात दिली. विनोद मोराणकर, राजीव खंडेलवाल, ॲड. समीर पंडीत, केदार जोशी, राजू निफाडकर गुरूजी, भरत देवळे, वसंतशेट अग्रवाल, बँकेचे देवपूर शाखा व्यवस्थापक उज्ज्वल कुळकर्णी, कर्ज विभागाचे गणेश जाधव, ज्योती केंद्रीकर, सुनेत्रा कुळकर्णी, उमा जोशी, गणेश सोनार, सचिन बागड, अशोक मोरे उपस्थित होते. उपव्यवस्थापक अरूण बाविस्कर यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT