Late Harshal Mali dhule latest marathi news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : शिरपूर शहरात युवकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : शहरातील रामसिंह नगर येथील २४ वर्षीय युवकाने बुधवारी (ता.१३) रात्री अकराला डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या (Suicide) केली. (youth commits suicide by shooting himself in head in Shirpur Dhule Latest Marathi news)

हर्षल भिका माळी असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील भिका माळी रामसिंग नगरमध्ये किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. रात्री अकराला रामसिंग नगरमध्ये गोळीबाराचा आवाज झाल्याने नागरिक धास्तावले. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता हर्षल माळी रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव सुरू होता.

त्याला तातडीने धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याने गावठी बनावटीच्या पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडल्याचे प्रथमदर्शनी आढळले. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याने गावठी पिस्तूल कुठून मिळवले याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ई-केवायसीला मुदतवाढ; अडचणी कायम, ‘लाडकी बहीण’ला सर्व्हर डाऊनचा अडथळा

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये 'एक नंबर'ची लढाई! नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध शिंदेसेनेचा ‘स्ट्रेट फाइट’

Latest Marathi News Live Update : विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण धडक, तिघे गंभीर जखमी

Instagram ने लॉन्च केलं Your Algorithm टूल; आता दिसणार फक्त तुमच्या पसंतीच्या रील्स, कसं वापरायचं फीचर? पाहा एका क्लिकवर

Viral Maggi Capsule: व्हायरल मॅगी कॅप्सूल व्हिडिओ खरा का? जाणून घ्या संपूर्ण तथ्य

SCROLL FOR NEXT