A youth tries to pull out a cow that has fallen into a gutter.
A cow lying in a gutter
A youth tries to pull out a cow that has fallen into a gutter. A cow lying in a gutter esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : गटारीत पडलेल्या गायीला जीवदान; तळोद्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांची भूतदया

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहरातील वीज वितरण कंपनीसमोरील गटारीत मंगळवारी (ता. १२) सायंकाळी गाय पडल्याची घटना घडली. गायीला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनास्थळी हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांनी जेसीबीच्या सहाय्याने गायीला बाहेर काढले.

तरुणांनी मुक्या प्राण्याबद्दल दाखविलेली भूतदया पाहून अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.( youth of Hindutvavadi organization saved life of cow that fell in drain nandurbar news)

शहरातील बहुतांश गटारी झाकण्यासाठी त्यांच्यावर सिमेंटचे चेंबर बसविण्यात आले आहेत. मात्र हे चेंबर बऱ्याच वर्षांपासून ऊन, वारा खात असल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. बऱ्याच ठिकाणी गटारींवरचे चेंबर उघडे आहेत, तर बऱ्याच ठिकाणची झाकणे अक्षरशः झिजली आहेत. दरम्यान, शहरातील वीज वितरण कंपनीसमोरील गटारीवरचे चेंबर जीर्ण झाल्याने तेथे गटारीच्या परिसरात चरत असलेली गाय गटारीत पडली.

या भागात अनेक हॉटेले असल्यामुळे बऱ्याचदा जनावरे चरत असतात. मंगळवारी गाय वासरासोबत चरत असताना जीर्ण झालेल्या झाकणावर तिचा पाय गेल्यामुळे झाकण तुटले आणि गाय गटारीत जाऊन पडली. अथक प्रयत्न करूनही गाय निघत नसल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी ही बाब हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळविली.

अमन जोहरी, रोहित माळी, पराग राणे, किरण ठाकरे, योगेश चव्हाण, पारस परदेशी, कार्तिक शिंदे, गोलू पाटील, सौरव कलाल, सागर गोसावी, गोलू गोसावी, पप्पू मराठे आदी तरुणांनी गायीला गटारीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी गायीला जाड दोर बांधून जेसीबीच्या सहाय्याने गायीला चेंबरमधून बाहेर काढले.

त्यांनी दाखविलेली भूतदया पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, तळोदा शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विविध रहिवासी भागात, बस स्टँड, धान्य मार्केट परिसरात, चिनोदा रोड परिसर, मेन रोड इत्यादी भागात मोकाट गुरे, कुत्रे व वराह झुंडीने फिरताना दिसून येत आहेत.

या झुंडीमुळे वाहनचालकांचे लहान-मोठे अपघात सातत्याने घडून येत असून, अनेकांना यामुळे जायबंदी व्हावे लागत असल्याचा अनुभव येत आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT