Dharti Devere, Sanjeevani Shisode, Abhilasha Patil while running in the District Sports Complex, Mukesh Thakur in the living appearance of Shri Shivaji Maharaj esakal
उत्तर महाराष्ट्र

ZP Sport Competition : जिल्हा परिषदेचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

जिल्हा परिषदेचे राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे गुरुवारी (ता. ८) सकाळी जिल्हा क्रीडासंकुलात उद्‍घाटन झाले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हा परिषदेचे राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे गुरुवारी (ता. ८) सकाळी जिल्हा क्रीडासंकुलात उद्‍घाटन झाले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन, ध्वजारोहण व पथसंचलन झाले. शंभर मीटर धाव स्पर्धेत जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी सहभागी झाले.

खानदेशचे दैवत श्री कानुमातेची मूर्ती डोक्यावर घेत सीईओ शुभम गुप्ता यांनी गीतांवर ठेका धरला. त्यांना नृत्याद्वारे आनंद व्यक्त करण्याचा मोह आवरता आला नाही. (Zilla Parishad Sports and Cultural Festival start dhule news)

अफजलखान वधाचा चित्तथरारक देखावा आकर्षण ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर यांनी, तर सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालयीन अधीक्षक दिनेश महाले यांनी अफजलखानाची भूमिका साकारली.

अध्यक्षा धरती देवरे यांनी आम्ही स्पर्धेत सहभागी होऊ आणि जिंकून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला. सीईओ गुप्ता यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना स्पर्धेत सहभागाचे आवाहन केले.

उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे.

महिला व बालकल्याण सभापती संजीवनी शिसोदे, शिक्षण व आरोग्य सभापती महावीरसिंग रावल, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, सदस्य गोकुळसिंग परदेशी, अभिलाषा पाटील आदी उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात पुरुष व महिला गटासाठी शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे, रस्सीखेच, गोळाफेक, लांबउडी, थाळीफेक, लिंबू चमचा, भालाफेक स्पर्धा झाल्या. दुपारच्या सत्रात कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, खो-खो, चालणे स्पर्धा पार पडल्या. नंतर शेलापागोटे, मनोरंजन, हास्यविनोद, तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

शुक्रवारी (ता. ९) सकाळी नऊपासून पुरुष आणि महिला गटासाठी खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल तसेच जलतरण आदी स्पर्धा होतील. १० फेब्रुवारीला कबड्डी, खो-खो, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने होणार आहेत. दुपारी दोन ते पाचदरम्यान पारितोषिक वितरण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT