amit shah on pm modi in up election
amit shah on pm modi in up election esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

PM मोदींमुळे कोरोना काळातही प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आली - शाह

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) भाजपच्या (BJP) मोठ्या नेत्यांकडून प्रचारसभा सुरू आहेत. आज उत्तर प्रदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांचा दौरा होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचं (PM Modi) कौतुक केलं, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीवर टीका केली.

गेली दोन वर्ष कोरोनाचं संकट होतं. पण, प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आली. आर्थिक धनसंपत्ती आली. हे सर्व फक्त पंतप्रधान मोदींमुळे शक्य झालं. मोदींच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक घरची आर्थिक परिस्थिती सुधारली, असा दावा अमित शाह यांनी केला. ते उत्तर प्रदेशातील प्रचारसभेदरम्यान बोलत होते.

बसप आणि समाजवादी पक्ष गरिबांचा विचारही करणार नाही. तसेच त्यांचा विकास देखील करणार नाही. या बुवा-भटजीने काय केले? असा सवाल शाह यांनी उपस्थित केला. गॅस, शौचालय, वीज, घर हे सर्व पंतप्रधान मोदींची देण आहे, असंही शाह म्हणाले. दरम्यान, लसीकरणावरून त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. अखिलेश यादव म्हणायचे की ही भाजपची लस आहे. पण, उत्तर प्रदेशातील सर्व जनतेने लस घेतली ना? असं शाह म्हणाले.

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक येत्या १० फेब्रुवारीपासून सात टप्प्यात होणार आहे. १० मार्चला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT