योगींच्या राज्यात पुन्हा हाथरस? सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा मृतदेह जाळला

Gangrape in Yogi Adityanath State
Gangrape in Yogi Adityanath Statesakal

मेरठ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) आणखी हाथरस बलात्काराच्या घटनेची (Hathras Gangrape) पुनरावृत्ती झाल्याचे दिसतंय. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बुलंदशहर (Bulandshahar) येथे सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. इतकेच नाहीतर तिच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कार करू न देता त्यापूर्वीच तिचा मृतदेह जाळण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुलीच्या कुटुंबीयांचं म्हणणं काय? -

''मुलगी ओबीसी समाजाची असून तिचे एका उच्च जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. एक दिवस तो आरोपी मुलगा अचानक पीडित मुलीच्या घरी आला आणि बाहेर चल म्हणून विनंती करू लागला. ती त्याच्या बाईकवरून बसून गेली. मात्र, काही वेळानंतर पोलिसांचा फोन आला की गावाच्या बाहेर मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मी घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मी पोलिसांनी प्रश्न विचारले असता त्यांनी माझ्यासोबत अरेरावी केली. आम्हाला मुलीचा मृतदेह जवळपास २४ तासानंतर दिला. त्यानंतर आमच्या घरी पोलिसांचा ताफा आला आणि आमच्या मुलीवर अंत्यसंस्कार करू न देता रात्रीच्या अंधारात तिचा मृतदेह जाळायला सांगितला. आम्ही असे करण्यास नकार दिला असता आम्हाला धमकवण्यात आले'', असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं. याबाबत भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी योगी सरकारवर आणि पोलिसांवर टीका केली आहे.

घटना आधीच घडली पण...

२१ डिसेंबरला मुलीवर बलात्कार झाला. पण, या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही, अशी धमकी पोलिसांनी दिली होती. त्यामुळं कुटुंबीय शांत होतं. या घटनेची माहिती राजकीय नेत्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ट्विट करत पोलिसांचा निषेध केला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली, असं एका ग्रामस्थाने टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितलं.

Gangrape in Yogi Adityanath State
दारुड्या मुलाचा आईवर बलात्कार; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

उत्तर प्रदेश पोलिसांनी फेटाळले आरोप -

पोलिसांनी कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी कुठलाही दबाव आणला नाही. मुलीचे उच्च जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याला धोका दिला होता, असं आरोपीला वाटलं. त्यामुळे त्यानं हे कृत्य केलं. पण, या घटनेचं राजकारण केलं जात आहे, असं बुलंदशहरचे एसएसपी संतोष सिंह यांनी सांगितलं.

आरोपीने पीडित मुलीवर बंदुकीतून गोळी झाडली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तसेच आरोपीने स्वतःच्या मानेवर आणि हातावर ब्लेडच्या सहाय्याने वार केले होते. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण दुसऱ्या पोलिस ठाण्यात वर्ग करण्याची मागणी केली होती. आम्ही त्याला सहमती दिली होती, असही संतोष सिंह यांनी सांगितलं.

अखेर आरोपींविरोधात गुन्हा दाखल -

पोलिसांना आरोपीविरोधात आणि हयगय करणाऱ्या पोलिसांविरोधा कारवाई करण्याची मागणी वारंवार करत होतो. पण, वरिष्ठ पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, असंही मुलीच्या वडिलांनी सांगितलं. हाथरसमध्ये एका १९ वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करून तिचा मृतदेह पोलिसांनी परस्पर जाळला होता. त्यानंतर संपूर्ण देशातून योगी सरकारवर टीका झाली होती. याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप करत बुलंदशहर येथील ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com