Mamata Banerjee Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Assembly Election: ममता निघाल्या अखिलेश यांच्या प्रचाराला

तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅंनर्जी यांनी आपण अखिलेश यांच्या प्रचाराला जात असल्याचं माध्यमांना बोलताना सांगितलं आहे.

दत्ता लवांडे

वाराणसी : सध्या उत्तरप्रदेशमधील निवडणुकींची रणधुमाळी चालू आहे. तेथील निवडणुका सात टप्प्यात होणार असून पाच टप्प्यातील मतदान झाले आहे. उद्या (ता.३) सहाव्या टप्प्यातील मतदान होणार असून खुशीनगर सह दहा जिल्ह्यांचा सामावेश यात आहे. मतदानाचा हे शेवटचे दोन टप्पे असल्यामुळे सर्वांनीच प्रचारासाठी कंबर कसली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये सध्या बहुरंगी लढत आपल्याला पहायला मिळणार आहे. भाजपा, सपा, बहुजन समाज पार्टी सह महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीसुद्धा या निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅंनर्जी यांनी आपण अखिलेश यांच्या प्रचाराला जात असल्याचं माध्यमांना बोलताना सांगितलं आहे.

त्या कोलकत्ता विमानतळावर असताना माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, "मी अखिलेश यांच्या प्रचारासाठी उत्तरप्ररदेशला जात आहे. तिथं जाऊन मी मंदीरात जाणार आहे आणि तिथल्या लोकांचे आशिर्वाद घेणार आहे." असं त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान त्या अखिलेश यादव यांच्या पक्षाला समर्थन करत प्रचार करणार असल्याचं समजतंय.

तब्बल ४०३ जागांसाठी ही निवडणुक होत आहे. त्यामुळे देशातील राजकारणात या राज्याला मोठं महत्त्व आहे. भाजपाकडून योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. उत्तरप्रदेशमधील निवडणुकांचा शेवटचा टप्पा हा सात मार्च ला होणार असून दहा मार्च ला निवडणुकांचे निकाल लगाणार आहेत. त्यानंतर सत्तेची चित्र स्पष्ट होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Supreme Court: केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार योग्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला सुनावले, आंदोलनाचा अधिकार अबाधित

NEET Result: कऱ्हाडमध्ये ‘नीट’मधील अपयशामुळे मुलीने जीवन संपवले; निकालानंतर होती तणावात..

Khadakwasla Dam: खडकवासला धरणसाखळी ९० टक्के भरली; पानशेतमधून वीज निर्मितीसाठी प्रथमच ६०० क्युसेक विसर्ग, मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ragi Uppu Urundai Recipe: नाचणी सत्त्व विसरा! फक्त 1 कप नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ, चविष्ट उप्पू उरुंडई; नाश्ता आणि टिफिनसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT