Sakshi Maharaj Narendra Modi esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

आता देशात चार बायका, 40 मुलं चालणार नाहीत : साक्षी महाराज

सकाळ डिजिटल टीम

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असले तरी, ते संपूर्ण जगाचे नेते आहेत.'

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उन्नावचे भाजप खासदार हरी सच्चिदानंद साक्षी यांनी सरोजिनीनगरमध्ये पक्षाचे उमेदवार राजेश्वर सिंह यांच्यासाठी काल प्रचार केला. ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांच्या समर्थनार्थ लोधी समाजानं स्वागत समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला साक्षी महाराज (Sakshi Maharaj) देखील उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना साक्षी महाराज म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भारताचे पंतप्रधान असले तरी, ते संपूर्ण जगाचे नेते आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार (BJP Government) येत्या काळात लोकसंख्या नियंत्रण कायदा करणार आहे. त्यामुळं आता देशात चार बायका, 40 मुलं असं चालणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

साक्षी महाराज पुढे म्हणाले, राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य प्रशासकीय सेवेत आहेत. ते स्वत: संचालनालयात सहसंचालक होते. आमदार किंवा मंत्री बनण्यासाठी नाही, तर देशसेवेसाठी राजेश्वर सिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीएम योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या सरकारनं उज्ज्वला गॅस योजना, पीएम आवास योजना, सौभाग्य योजना, किसान सन्मान निधी योजना, शौचालय योजना सुरू केल्या आहेत. त्या कोणत्याही एका वर्गासाठी नसून संपूर्ण समाजासाठी आहेत.

विरोधी पक्षाचे नेते एकाच समाजातील लोकांचा विकास करत आहेत. मात्र, मोदी सरकार सर्व समाजातील लोकांचा विकास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला राजेंद्र लोधी, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण लोधी, माजी खासदार रीना चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेशसिंह चौहान आदी उपस्थित होते. भाजपचे उमेदवार राजेश्वर सिंह यांनी ईडीमध्ये असताना गुन्हेगार आणि भ्रष्टावर कारवाई केलीय. अवैधरित्या लुटलेली कोट्यवधी रुपयांची मालमत्ताही त्यांनी जप्त केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅम कितीला? पाहा तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा ताजा भाव

मोबाईल नाही, पुस्तके वाचा; १८ वर्षांपूर्वी मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका! नितीश भारद्वाज यांचा पालकांना सल्ला

Live Updates Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा, भक्ती आणि सेवाभावाचा दिला संदेश

Chaturmas 2026 Dos & Don'ts: आजपासून चातुर्मासाला सुरुवात; या काळात काय करावं, काय टाळावं? जाणून घ्या नियम आणि धार्मिक महत्त्व

Commonwealth Games 2026 : भाजी विक्रेता, इ रिक्षा चालक... Jhandu Kumar ने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला जिंकून दिले पदक

SCROLL FOR NEXT