samajwadi party samajwadi party
Uttar Pradesh Assembly Election 2022

सपा, अपना दलात (कम्युनिस्ट) फूट? काय आहे वादाचे कारण

आमच्यासाठी जागा ठरल्या होत्या. मात्र, आम्ही सर्व जागा सपाला परत करतो

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक आठवडा शिल्लक आहे. असे असताना समाजवादी पक्षाच्या आघाडीत मोठा वाद निर्माण झाला आहे. सपा आणि अपना दल (कम्युनिस्ट) यांच्यात फूट पडल्याचे वृत्त आहे. काही मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केला की, अपना दलाची उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांच्या विरोधात सिरथूमधून लढण्यास नकार दिला आहे. भाजपच्या दिग्गज उमेदवाराच्या विरोधात सपाने पल्लवीच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या विरोधात विजय मिळवणे सोपे नाही, असा पक्षाचा विश्वास आहे. (Pallavi patel will not fight against Keshav Prasad Maurya?)

अपना दलचे (कम्युनिस्ट) (Apna Dal) राष्ट्रीय सरचिटणीस पंकज निरंजन यांनी टीव्ही चॅनलशी बोलताना युती तुटली नसल्याचे सांगितले. मात्र, वादाची कबुली दिली. पक्षाने जाहीर केलेल्या सर्व सात जागा सपाला दिल्या आहेत. आता सपाला निर्णय घ्यायचा आहे, असे ते म्हणाले. पल्लवी पटेल सिरथूमधून निवडणूक लढवणार की नाही? याला उत्तर देताना पंकज म्हणाले की, त्यांचा पक्ष कुठून लढणार आणि कुठून लढणार नाही, हे स्पष्ट नाही. तथापि, त्यांनी असेही सांगितले की त्यांच्या पक्षाने मुद्द्यांच्या आधारावर सपाला (Samajwadi Party) पाठिंबा दिला आहे आणि लढण्यासाठी एकही जागा दिली नाही तरीही युतीसोबतच राहील.

आमच्यासाठी जागा ठरल्या होत्या. मात्र, आम्ही सर्व जागा सपाला परत करतो. ज्या जागा सोयीच्या असतील, त्या सांगू, असे आमच्या वतीने सांगण्यात आले आहे. एकही जागा दिली नाही तरी निवडणूक (Samajwadi Party) लढवू, असेही पंकज म्हणाले. जौनपूर, बनारस, मिर्झापूर, प्रतापगड, अलाहाबाद या जागांवर वाद आहे. अपना दल कमेरावादीने या जागांवर उमेदवार निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता सपाकडून (Uttar Pradesh) घेतलेल्या निर्णयामुळे पक्ष नाराज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT