Police arrested bjp leader for distributing liquor and money  टिम ई सकाळ
Uttar Pradesh Assembly Election 2022

भाजप नेता मतदानाच्या आदल्यादिवशी वाटत होता पैसे, दारु; पोलिसांकडून अटक

गाझीपूरच्या जमानिया येथील भाजप मंडळाच्या अध्यक्षसह तिघांना पैसे आणि दारू वाटप करताना पोलिसांनी काल रात्री पकडले.

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशातील निवडणुक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उद्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेतील शेवटच्या टप्प्यातील मतदान पडणार आहे. अशात गाझीपूरच्या (Gazipur) जमानिया येथील भाजप मंडळाच्या अध्यक्षसह तिघांना पैसे आणि दारू वाटप करताना पोलिसांनी काल रात्री पकडले.. आरोपीच्या कारमधून देशी दारूचे चार बॉक्स, ६० हजार ७०० रुपयांची रोकड, भाजपच्या निवडणूक चिन्हाचे चार पानांचे एकूण १० स्टिकर जप्त करण्यात आले आहेत. (Police arrested bjp leader for distributing liquor and money)

भाजपचे जमानिया मंडळाचे अध्यक्ष अनिल गुप्ता यांनी भाजपच्या उमेदवार सुनीता सिंह यांच्या समर्थनार्थ पैसे आणि दारु पुरवठा केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. बुद्धिपूर येथे अनिल गुप्ता यांनी आपले साथीदार नितेश निगम आणि रोहित कुमार यांच्यासह मतदारांना आमिष दाखवण्यापोटी पैशाचे वाटप केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ५४ जागांसाठी मतदान होणार आहे.सातव्या आणि अखेरच्या टप्प्याच मतदान महत्वाचं आहे. त्यात भाजपानं राज्यातील या ५४ जागांवर लक्ष केंद्रीय केलं आहे. सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ देखील आहे. यासह समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी देखील सातव्या टप्प्यात विशेष लक्ष दिलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुद्द प्रचारात उतरले दिसुन आले. १० मार्च ला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असुन उत्तरप्रदेशमध्ये कुणाची सत्ता येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT