राहुल गांधी esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election 2022 : मोदीजी खुर्ची वाचवण्यासाठी खोट बोलतात : राहुल गांधी

सरचिटणीस प्रियांका गांधी या निवडणुकीमुळे दोन दिवसांपासून वाराणसीत तळ ठोकून आहेत

सकाळ वृत्तसेवा

वाराणसी: नरेंद्र मोदीजी म्हणतात की मी हिंदू धर्माचे संरक्षण करतो. मोदीजी आपण खोटं बोलू नका. आपण शेतकरी, मजुरांसाठी नाही तर आपली खुर्ची वाचवण्यासाठी खोट बोलतात आणि असत्याला साथ देतात, असा आरोप आज कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. देशात आणि राज्यात बेरोजगारी आणि महागाईच्या समस्येने उग्र रुप धारण केल्याचेही राहुल म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आज वाराणसीला पोचले. सरचिटणीस प्रियांका गांधी या निवडणुकीमुळे दोन दिवसांपासून वाराणसीत तळ ठोकून आहेत. आज गांधी भावंडांनी एक किलोमीटर पायी चालत काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेतले. त्यांनी पूजा केली. त्यानंतर पिंडरा विधानसभेच्या प्रचारासाठी फुलपूरकडे रवाना झाले. तेथे सभेत बोलताना राहुल म्हणाले, की सध्या आपले पंतप्रधान रोजगार, नोकरी आणि पंधरा लाखांची गोष्ट का करत नाहीत? आपल्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील, असे आपण कधीही म्हणणार नाही. कारण मी तुमच्यासारखे खोटं बोलू शकत नाही. ते म्हणतात, की आम्ही परकीय आहोत. आमचे कुटुंब अलाहाबादचे आहे. मोदी यांनी एकदा मगरीशी लढाई केल्याचे मी ऐकले आहे. परंतु आपण पाहिले की ते जेव्हा गंगा नदीत उतरले तर त्यांना पोहता देखील येत नव्हते. तुम्हाला चांगले वाटो किंवा न वाटो, आपल्याला उत्तर प्रदेशात रोजगार मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आपण आपल्या मुलांना कॉलेज, विद्यापीठात पाठवता. शिक्षणाचा खर्च खिशातून करतो. मुलांना शिक्षण दिले की त्याला नोकरी मिळेल, असे आपल्याला वाटत असते. परंतु सध्याची स्थिती पाहता रोजगाराची स्थिती चिंताजनक आहे.

राहुल यांच्याकडून प्रियांकांचे कौतुक

राहुल गांधी म्हणाले की, आपण आपला वेळ आणि मत वाया घालवू नका. नवीन उत्तर प्रदेश निर्माण करण्याची वेळ आली आहे. प्रियांका आणि कॉंग्रेसच्या सहकाऱ्यांचे आपण अभिनंदन करतो. आपण उत्तर प्रदेशात जोरात लढाई केली. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागत केले. माध्यमांनी त्यांच्याशी बेालण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांनी त्यास नकार दिला. प्रियांका गांधी या दोन मार्चपासून वाराणसीत आहेत. कबीर चौरा येथील कबीर मठ येथे त्या थांबल्या आहेत. त्यांनी काल वाराणसीतील प्रसिद्ध कलांकाराच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्या सारनाथला गेल्या. यादरम्यान त्यांनी फेरीवाले, व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT