bsp mayavati esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election 2022 : सप, भाजप काळात यूपीची जनता दु:खी

मायावती; योगींकडून विशिष्ट वर्गाला संरक्षण

सकाळ वृत्तसेवा

वाराणसी: समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत उत्तर प्रदेशची जनता दु:खी राहिल्याची टीका आज बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली. वाराणसीच्या संदहा येथे जाहीर सभेत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सातव्या टप्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. बसपच्या नेत्या मायावती यांनी चौबेपूरच्या संदहा येथील सभेत कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षावर टीका केली. त्या म्हणाल्या, बहुजन समाज पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवत आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. भाजप असो किंवा समाजवादी पक्षाचे सरकार असो त्यांनी मागास आणि दलितांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचे खच्चीकरण केले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या वर्गाची मोठी हानी झाली आहे. बहुजन समाज पक्षाचे सरकार आल्यास भदोहीचे नामकरण पुन्हा संत रविदास नगर करू. आदित्यनाथ यांच्या धोरणावर बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांना मुस्लिम, ब्राह्मण आणि दलित वर्गात गुंड, माफिया दिसतात. त्यांच्या घराची आणि मालमत्तेची नासाडी करत आहेत. त्याचवेळी एका वर्गावर त्यांचा कोणताही अंकुश नसून याउलट त्यांना संरक्षण देण्याचे काम केले जाते. बहुजन समाज पक्षाचे सरकार आल्यास त्या विशेष वर्गातील माफियांच्या घरावर बुलडोझर चालवू, असेही त्या म्हणाल्या. योगींना पुन्हा मठात पाठवण्यासाठी जनतेने तयारी करावी. ते द्वेषभावनेतून राजकारण करतात. बसप सत्तेवर आल्यास सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या तत्त्वाने विकासकामे केली जातील. समाजवादी पक्ष आणि भाजप जी विकासकामे अर्धवट स्थितीत सोडली आहेत किंवा बंद केली आहेत, ते पुन्हा सुरू केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT