Sanjay Raut Visit Uttar Pradesh e sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

''२०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल तेव्हा...'', राऊतांची डरकाळी

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेश निवडणुकीत (UP Election 2022) यंदा शिवसेना देखील उतरली आहे. शिवसेना काही जागा लढवत आहे. त्यासाठीच आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेचं उत्तर प्रदेशात काय काम आहे? असं अनेकजण विचारतात. पण, २०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल तेव्हा त्यांना समजेल शिवसेनेचं काय काम होतं, असं राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री होणार. शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना वाघ म्हणतात. वाघ जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा सर्व देश ऐकतो. जसे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फोडलेली डरकाळी सर्व देश ऐकतो. आमच्याकडे खूप हिंदी भाषिक लोक आहेत. पण, महाराष्ट्रात जिथंही जातो तिथे जास्तीत जास्त लोक उत्तर प्रदेशातील लोक आहेत. आमचं उत्तर प्रदेशासोबत नातं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

आमचं राजकारण आधीपासून पारदर्शक आहे. आमच्या हातात हिंदूत्वाचा भगवा आहे. पण आमच्यासोबत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन सर्वच जाती-धर्माचे लोक आहेत. आम्ही देशहिताचं राजकारण करतोय. कोणाच्या हृदयात कोणाचं रक्त आहे हे १० मार्चला समजेल. तुमच्या रक्तात काय आहे? हे जनता ठरवणार आहे, असंही राऊत म्हणाले.

ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी तुम्हाला राज्याच्या वेशीवर ठेवलं, त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या सरकार तुमच्या पाठिमागे खंबीरपणे उभे होते. आता देखील आम्ही तुमच्यासोबत आहोत. शिवसेनेचं तुमच्यासोबत रक्ताचं नातं आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र उत्तर भारतीयांसोबत उभा राहिला आणि पुढेही असाच उभा राहिल, अशी ग्वाही संजय राऊतांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT