Uttar Pradesh Assembly Election esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

मतदान केंद्रावर Photo काढणं पडलं महागात; महापौरांवर थेट कारवाई

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशात सात टप्प्यातील निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Assembly Election) सात टप्प्यातील निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 16 जिल्ह्यातील 59 विधानसभा जागांसाठी मतदान सुरुय. मात्र, आज मतदानादरम्यान कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे (Mayor Pramila Pandey) यांच्यावर मतदानाची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. महापौरांवर डीएमनं एफआयआर (FIR) नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महापौर पांडे यांच्यावर मतदानादरम्यान ईव्हीएम बूथमध्ये (EVM Booth) मतदान करतानाचा फोटो सार्वजनिक केल्याचा आरोप आहे. फोटोमध्ये त्या एका पक्षाला मतदान करताना दिसत आहेत. याबाबत कानपूरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी नेहा शर्मा (Election Officer Neha Sharma) यांनी सांगितलं की, पांडे यांनी शहरातील हडसन स्कूल (Hudson School Kanpur) मतदान केंद्रावर मतदानाची गोपनीयता भंग केल्याची माहिती मिळालीय. यावर निवडणूक नियमानुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, पांडे यांनी मतदारांना निवडणूक नियमांचं पालन करून मतदान करण्याचं आवाहन केलंय. मतदान करताना ईव्हीएमचे फोटो काढणं निवडणूक नियमांच्या विरोधात आहे, असंही त्याच म्हणाल्या. कानपूर ग्रामीण भागातील भोगनीपूर विधानसभेच्या (Bhognipur Assembly Constituency) बूथ क्रमांक 121 वर मतदारांनी आक्षेप घेतल्या. याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केलीय. तर, कानपूरच्या कल्याणपूर विधानसभा मतदारसंघात जवाहरलाल मतदान केंद्रातील 46 आणि 50 क्रमांकाच्या खोल्यांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळं मतदान एक तास उशिरा सुरू झाल्याची माहिती मिळालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT