Political Party Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Assembly Election : काठांवरील जागांवर सर्वपक्षीयांचे लक्ष

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘डेटा’नुसार ४०३ पैकी या ४७ जागा सर्वच पक्षांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तरप्रदेशात मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयातील मतांची तफावत पाच हजारांपेक्षाही कमी होती, अशा काठांवर असलेल्या मतदारसंघांवर बड्या राजकीय पक्षांचे विशेष लक्ष आहे. राज्यात असे काठावरील ४७ मतदारसंघ आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘डेटा’नुसार ४०३ पैकी या ४७ जागा सर्वच पक्षांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. (Uttarpradesh assembly Elecrion Updates)

मागच्यावेळेस यातील २३ जागा या भाजपने जिंकल्या होत्या तर समाजवादी पक्ष १३ जागांवर विजयी झाला होता. बहुजन समाज पक्षाला यातील आठ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस, अपना दल आणि राष्ट्रीय लोक दलाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. या सर्वच ठिकाणांवर बोटांवर मोजण्या एवढ्या मतांनी निकाल बदलला होता त्यामुळे सर्वच पक्षांनी यंदा मतांचे गणित जुळवून आणण्यासाठी येथे योग्य उमेदवारांच्या निवडीला प्राधान्य दिले आहे. राजकारणामध्ये विजय हा महत्त्वपूर्ण असला तरीसुद्धा मतांमधील फरक देखील खूप महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे यंदा सर्वच राजकीय पक्षांनी या काठांवरील जागांवर विशेष लक्ष दिल्याचे दिसते, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

हे मतदारसंघ महत्त्वाचे

राज्यातील लोकसंख्येमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) प्रमाण ५० टक्के आहे. यामुळे मतांच्या गणितामध्ये ‘ओबीसीं’चा वाटा महत्त्वाचा ठरेल. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत सिद्धार्थनगरमधील दमरियागंज येथे १७१ एवढ्या कमी मतांच्या फरकाने भाजपचे उमेदवार राघवेंद्र प्रतापसिंह यांचा विजय झाला होता. त्यांनी ‘बसप’चे सायेदा खातून यांना पराभूत केले होते. भाजपचे अवतारसिंग भादाना हे १९३ मतांनी जिंकले होते.

यंदा त्यांनी राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला आहे. बहुजन समाज पक्षाच्या श्यामसुंदर शर्मा यांनी मथुरेतील मांत मतदारसंघातून ४३२ मतांनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले होते. गोहना, रामपूर मणिहरन (सहारनपूर) आणि मुबारकपूर (आझमगड) येथील उमेदवार एक हजारापेक्षाही कमी मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

भाजप अन् ‘सप’च्या अपेक्षा

‘हिंदुत्वा’च्या जोडीला विकास याआधारावर चांगले निष्कर्ष आपल्या हाती येवू शकतात, असा विश्वास भाजपश्रेष्ठींना आहे. अखिलेश यांनीही स्थानिक पातळीवर काही विशिष्ट जातींचे नेतृत्व करणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केली असून त्यातून देखील काही सकारात्मक निकाल हाती येतील असे त्यांना वाटते. स्वामीप्रसाद मौर्य, दारासिंह चौहान आणि धरमसिंह सैनी या नेत्यांमुळे आपल्याला फायदा होईल, असे ‘सप’ला वाटते.

मताधिक्य हे कोणत्याही नेत्याची स्वीकारार्हता दर्शविते त्यामुळेच राजकीय पक्ष विजयाचे निकष ठरवूनच नव्या उमेदवारांच्या निवडीला प्राधान्य देत असल्याचे दिसते. पक्षांतर्गत पातळीवर केले जाणारे विश्लेषण आणि सर्वेक्षण या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरते आहे.

-सिद्धार्थ कलहंस, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT